pera cet exam for private university admission education Sakal
पुणे

PERA CET 2024 : खासगी विद्यापीठांमधील प्रवेशासाठी २४ ते २६ मे दरम्यान होणार ‘पेरा सीईटी’

राज्यातील खासगी विद्यापीठांच्या प्रीमिनेंट एज्युकेशन ॲण्ड रिसर्च असोसिएशनच्या (पेरा) वतीने २४ ते २६ मे दरम्यान ‘पेरा सीईटी’ घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील खासगी विद्यापीठांच्या प्रीमिनेंट एज्युकेशन ॲण्ड रिसर्च असोसिएशनच्या (पेरा) वतीने २४ ते २६ मे दरम्यान ‘पेरा सीईटी’ घेण्यात येणार आहे. खासगी विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते.

या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी १९ मे पर्यंत मुदत असून परीक्षेचा निकाल ३१ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी दिली.

पेरा सीईटीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कराड यांनी ही माहिती दिली. यावेळी जीएसपीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. बी. अहुजा, डी. वाय पाटील विद्यापीठाच्या (अंबी) कुलगुरू डॉ. सायली गणकर, जी.एच.रायसोनी स्किल टेक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. यू. खरात,

प्र.कुलगुरू डॉ. मोहित दुबे, पेराचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. हणमंत पवार, स्ट्रॅटेजिक सल्लागार डॉ. सुराज भोयर आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील नामांकित २५ खासगी विद्यापीठांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा देणे अनिवार्य आहे.

अभियांत्रिकी, जैवअभियांत्रिकी, फूड टेक्नॉलॉजी, मरीन इंजिनिअरिंग, कृषी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, फाइन आर्ट्स, डिझाइन, व्यवस्थापन, विधी आणि वास्तुविशारद यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा आहे. .

‘पेरा’अंतर्गत असणारी विद्यापीठे

एमआयटी-एडीटी, एमआयटी-डब्ल्यूपीयू, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, संदीप युनिव्हर्सिटी, स्पायसर, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, एमजीएम युनिव्हर्सिटी, सिंबायोसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, सोमैया विद्याविहार युनिव्हर्सिटी,

विजयभूमी युनिव्हर्सिटी, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील अॅग्रीकल्चर अॅण्ड टेक्निकल युनिव्हर्सिटी, श्री बालाजी युनिव्हर्सिटी, फ्लेम युनिव्हर्सिटी, डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी, जेएसपीएम युनिव्हर्सिटी, एनआयसीएमएआर युनिव्हर्सिटी, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, डीईएस पुणे विद्यापीठ, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, जी.एच. रायसोनी स्किल टेक विद्यापीठ आणि संजीवनी विद्यापीठ.

‘पेरा सीईटी’बाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.peraindia.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचंच वर्चस्व

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT