Hospital beds Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यातील वडगाव रासाई येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास परवानगी

पुणे जिल्ह्यातील वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यास राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (ता. ७) मंजुरी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यास राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (ता. ७) मंजुरी दिली आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) वडगाव रासाई (Vadgaon Rasai) (ता. शिरूर) येथे ३० खाटांचे (Beds) ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital) सुरु करण्यास राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने (Health Mantralay) गुरुवारी (ता. ७) मंजुरी दिली आहे. हे जिल्ह्यातील विसावे ग्रामीण रुग्णालये असणार आहे. दरम्यान, या रुग्णालयाच्या इमारत बांधकामाबाबत आणि आवश्‍यक पदनिर्मितीबाबत लवकरच स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने याबाबत दिलेल्या मंजुरी आदेशात म्हटले आहे.

या रुग्णालयाच्या मंजुरीचा आदेश गुरुवारी जिल्हा परिषदेला मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात सद्यःस्थितीत औंध येथील एक जिल्हा रुग्णालये, पाच उपजिल्हा रुग्णालये आणि १९ ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. पूर्वीच्या १९ ग्रामीण रुग्णालयात आता वडगाव रासाई येथील रुग्णालयाने एकची भर पडणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

या नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाने आरोग्य सहसंचालक कार्यालयाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव आरोग्य सहसंचालक कार्यालयाने पुढील मंजुरीसाठी १४ फेब्रुवारी २०२२ ला आरोग्य मंत्रालयाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर केल्याचे आदेश आरोग्य विभागातील अवर सचिव डी. एन. केंद्रे यांनी पुणे जिल्हा परिषदेला पत्राद्वारे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT