PMRDA Sakal
पुणे

पुणे : धरणे, कालवे परिसरात २० टक्के बांधकाम करण्यास परवानगी

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील (पीएमआरडीए) धरणे, कालवे, नैसर्गिक जलस्‍त्रोत यांच्या परिसरात क्रॉंक्रिटचे जंगल उभारू नयेत यासाठी विशेष नियोजन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील (पीएमआरडीए) (PMRDA) धरणे, (Dam) कालवे, (Canal) नैसर्गिक जलस्‍त्रोत यांच्या परिसरात क्रॉंक्रिटचे (Concrete) जंगल उभारू नयेत यासाठी विशेष नियोजन केले आहे. त्यासाठी वरील सर्वांच्या परिसरात जी-२ झोन दर्शविण्यात आला आहे. या झोनमध्ये एकूण क्षेत्रफळाच्या २० (०.२) टक्के बांधकाम करण्यास परवानगी देऊ केली आहे.

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या २३ गावांसह संपूर्ण हद्दीचा प्रारूप विकास आराखडा ‘पीएमएमआरडीए’ने प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पर्यावरणाला पूरक आणि पारंपारिक शेती टिकवण्यासाठी अनेक तरतुदींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

पीएमआरडीएची जवळपास सात हजार चौरस किलोमीटरची हद्द आहे. विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीला लागून असलेल्या अनेक गावात शेती संपुष्टात येऊन, तेथे क्रॉंक्रिटचे जंगल झाले आहे. त्यापैकी २३ गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाले आहे. या गावांच्या हद्दीला लागूनच काही भागात आजही शेती टिकून आहे. विशेषतः कालव्यांच्या आणि नैसर्गिक जलस्त्रोतांच्या बाजूला असलेल्या भागात आजही शेती केली जाते. ती नष्ट होऊन, त्या ठिकाणी कॉंक्रिटचे जंगले तयार होऊ नये, यासाठी त्यांचा समावेश जी-२ झोनमध्ये करण्यात आले आहे. हद्दीतील नदी-नाले, धरणे, कालवा यांच्या परिसरात बांधकामांवर मर्यादा घालण्यात आली आहे. त्‍यासाठी जलसंपदा विभागाकडून कमांड एरिया निश्‍चित करून घेण्यात आला आहे. त्‍यावर जी-२ झोन हा दर्शविण्यात आला आहे. ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत निवासी भागात मान्य एक एफएआय (चटई क्षेत्र निर्देशांक) वापरून बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर जी-२ झोनमध्ये बांधकामावर मर्यादा आणून २० (०.२) टक्केच बांधकाम करण्यास या आराखड्यात परवानगी देण्यात आली आहे.

तर प्रिमिअर शुल्क भरा

‘जी- १ झोन’ मध्ये म्हणजे शेती विभागात प्रिमिअर शुल्क भरून, वाढीव बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे. तर गावठाणाच्या हद्दीपासून पाचशे मीटरच्या परिसरातही एक एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT