पुणे

ट्रॅक्टर विहिरीत पडून चालक जागीच ठार

विजय मोरे

उंडवडी : शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीचे सपाटीकरणाचे काम करत असताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रॅक्टर पंचवीस फूट विहिरीत कोसळून चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खराडेवाडी (ता. बारामती) येथे आज सकाळी आठच्या दरम्यान घडली. या घटनेत दिलीप गणपत भगत (वय 48)रा साबळेवाडी -भगतवाडी (ता. बारामती) असे मृत्यूमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. 

साबळेवाडी - भगतवाडी येथील दिलीप भगत हे आज सकाळी साडे सातच्या दरम्यान खराडेवाडी हद्दीतील जाळीबुवा मंदीरानजिक गट 205 मध्ये शेतकरी राजेंद्र अर्जुन भापकर यांच्या शेतात जमिन सपाटीकरणाचे काम करण्यासाठी ट्रॅक्टर व औजार- फरांडी घेवून आले होते. यावेळी शेतात जमिन सपाटीकरणाचे काम सुरु झाल्यानंतर विहीरीलगत ट्रॅक्टर पाठीमागे घेत असताना भगत यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पंचवीस फूट विहीरीत कोसळला. यामध्ये चालक भगत यांचा जागीच मृत्यू झाला.

काही वेळानंतर शेतकरी राजेंद्र भापकर शेतात आल्यानंतर त्यांना ही घटना समजली. घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून घटनेचा पंचनामा केला. यावेळी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT