Vaikunth cemetery pune
Vaikunth cemetery pune Sakal
पुणे

वैकुंठ स्मशानभूमीमधून होणा-या वायूप्रदुषणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वैकुंठ स्मशानभूमीमुळे (Vaikuntha Cemetery) होणा-या वायुप्रदूषणाविरोधात (air pollution) नवी पेठेतील सोसायट्या (Society) एकवटल्या आहेत. आमचा परिसर आम्हाला प्रदूषणमुक्त (Pollutionfree) हवा आहे. त्यासाठी असणा-या उपाययोजना करा, अशी मागणी करणारी याचिका (Petition) सहा सोसायट्यांनी एकत्रित येऊन उच्च न्यायालयात (High Court) जनहित याचिका दाखल केली आहे. (Petition filed in High Court against air pollution from Vaikuntha cemetery)

नवी पेठेतील आनंदबाग को-ऑपरेटिव्ह सोसायटी, सुंदरबन सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, फाटक बाग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, प्रणव को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, दी सत्संग को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड आणि अनुपम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड या सहा सोसायटींच्या अध्यक्षांनी अ‍ॅड असीम सरोदे, अजिंक्य उडाणे, अ‍ॅड. अजित देशपांडे आणि अ‍ॅड. पूर्वा बोरा यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. पुणे महानगरपालिका, महापालिकेचा विद्युत विभाग, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य शासन आणि आरोग्य विभाग यांना त्यात प्रतिवादी करण्यात आले आहे. यापूर्वी नवी पेठेतील रहिवासी विक्रांत धनंजय लाटकर यांनी देखील अशाच प्रकारची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या आहेत मागण्या :

- चिमणीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे

- प्रदूषणावर नियंत्रण आणणारी यंत्रणा कार्यान्वित करावी

- स्मशानभूमीच्या संख्येत वाढ करणे गरजेचे

- सर्व स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनीची सुविधा कार्यान्वित करावी

- स्मशानभूमीमध्ये क्रमाक्रमाने शव अंत्यसंस्कारासाठी पाठवावीत

- लोकसंख्येच्या तुलनेत स्मशानभूमीच्या संख्या वाढवावी

वैकुंठच का?

महापौरांच्या टीमने वैकुंठ स्मशानभूमीला भेट दिल्यानंतर अजून तीन मशिन इथे आणणार आहेत असे सांगितले. मात्र हे मशिन वैकुंठातच का बसविण्यात येत आहेत? असा आमचा प्रश्न आहे. पुण्यात २१ स्मशानभूमी आहेत. आधीच वैकुंठ स्मशानभूमीवर ताण आला आहे. ही स्मशानभूमी मध्यवर्ती भागात आहे. सध्याच्या धुराच्या प्रदूषणावर नियंत्रण न आणता अजून ताण वाढवला जात आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

वैकुंठ स्मशानभूमीतील सततच्या वाढत्या धुराच्या प्रदूषणामुळे आसपासच्या सोसायट्यांमधील दोन ते तीन हजार नागरिकांसह निवारा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना देखील याचा त्रास होत आहे. स्मशानभूमीतील चिमणी आणि मशिन्स जुने झाली असून, त्याची योग्यप्रकारे देखभाल दुरुस्ती केली जात नसल्यामुळे चिमणीमधून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडत आहे.

- सुमीत सबनीस, याचिकाकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : मोहसीन खानने मुंबईला दिला तगडा झटका

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT