पुणे

तळेगाव स्टेशन - पिस्तुलाचा धाक दाखवून सव्वातीन लाख लुटले

गणेश बोरुडे

तळेगाव स्टेशन - नवलाख उबंरे येथील पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड बँकेमध्ये भरण्यासाठी घेऊन जात असलेल्या दुचाकीवरील दोघांना, पिस्तुलाचा धाक दाखवून तिघांनी ३ लाख १९ हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना सोमवारी (ता.०८) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आंबीजवळ घडली.

तळेगाव एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथे तळेगाव एमआयडीसीलगत करंजविहीरे रस्त्यावर रवी शेटे यांचा हिंदूस्तान पेट्रोलीयमचा सई पेट्रोलियम नावाचा पंप आहे.या पंपावरील जमा झालेली पावनेचार लाखांची रोख रक्कम पंपावरील दोन कर्मचारी बँकेत भरण्यासाठी तळेगावला जात होते. दरम्यान आंबी-वराळे रस्त्यावरील इंद्रायणी नदीच्या पुढील वळणावर हॉटेल साईरंग जवळ, एका काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकी मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी त्यांना अडवले. पिस्तुलाचा धाक दाखवत बॅगमधील ३ लाख १९ हजार आठशे रुपयांची रोकड घेऊन चोरटे तळेगावच्या दिशेने पसार झाले. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र राजमाने, सहायक पोलिस निरीक्षक साधना पाटील, उपनिरीक्षक अरविंद हिंगोले आणि सहकारी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. घटनेची चौकशी करत वराळे रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपास चालू केला आहे. याप्रकरणी पंपावरील कर्मचारी ज्ञानेश्वर पुणाजी कोळेकर (३०, करंज विहीरे, ता.खेड, जि.पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तिघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत. यापूर्वीही याच ठिकाणाच्या जवळपास चिटफंडाची लाखोंची रोकड शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत लुटण्याचा प्रकार घडला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : हनुमानाची भूमी काँग्रेसला माफ करणार नाही- पीएम मोदी

SCROLL FOR NEXT