oman-stap.jpg
oman-stap.jpg 
पुणे

पुण्याच्या आर्यनने रेखाटलेले चित्र ओमानच्या पोस्टल स्टॅम्पवर

सकाळवृत्तसेवा

पुणे : मस्कतमध्ये शिकणाऱ्या पुण्यातील एका मुलाने तीन वर्षांपूर्वी आपल्या कुंचल्याने रेखाटलेल्या चित्रातून "जागतिक शांततेचा' संदेश दिला होता. ते चित्र, त्यातून दिलेला संदेश इतके अप्रतिम आहे की, त्याची दखल थेट ओमानच्या सुलतानने नुकतीच घेतली. तो संदेश देशभर पोचविण्यासाठी त्या चित्राचे "पोस्टल स्टॅम्प' प्रकाशित करण्यात आले आहे. 

आर्यन कांचन शेरे असे या पुणेकर मुलाचे नाव. आर्यन 2016 मध्ये मस्कतमधील ब्रिटिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकत होता. त्या वेळी शाळेत आयोजित केलेल्या एका प्रदर्शनासाठी त्याने 'जागतिक शांततेचा' संदेश देणारे चित्र आपल्या कुंचल्यातून चितारले होते. हे चित्र त्यावेळी शाळेच्या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. दोन वर्षांनंतर आता आर्यनचे चित्राला ओमानच्या 'पोस्टल स्टॅम्प'वर स्थान मिळाले आहे. 
निळ्या रंगांच्या विविध छटांमध्ये रेखाटलेल्या या चित्रात लाल रंगातील दोन पक्षी आहेत. शांततेचे स्पष्ट संदेश देणारे हे चित्र त्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले. शाळेच्या या प्रदर्शनातील या चित्राची दखल खुद्द ओमानाच्या सुलतानने घेतली. ओमानच्या सुलतानने त्यांच्या देशाचा 'पोस्टल स्टॅम्प' करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आर्यनच्या पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण, या दरम्यान, आर्यन मस्कत येथून बहारीन येथे स्थलांतरित झाला होता. पण, ब्रिटिश स्कूलने त्याच्या आई अपर्णा यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. आर्यनचे चित्र स्टॅम्पवर प्रकाशित करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे 25 मार्चला मस्कत येथे हा स्टॅम्प प्रसिद्ध करण्यात आला. 

आर्यनचे पुण्यात राहणारे आजोबा हेमंत सातपुते या बाबत "सकाळ'ला माहिती देताना म्हणाले, "लहानपणापासूनच आर्यनला चित्रकलेची आवड आहे. त्याने ती चांगल्या प्रकारे जोपासली आहे. ओमानच्या त्याचे चित्र ओमानाच्या स्टॅंम्पवर येणे, ही त्याच्या कलेला मिळालेली दाद आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

SCROLL FOR NEXT