पुणे

पिलीव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. ३ लाख ७४ हजाराचा मुद्देमाल जप्त

CD

पिलीवमध्ये जुगार अड्ड्यावर
छापा; सहा जण ताब्यात
पोलिसांनी केला ३.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
पिलीव, ता. १४ : माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील काळामळा परिसरातील पडीक शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी (ता. १३) छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या सहा जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून ६४ हजार ८० रुपये रोख, पाच मोबाईल आणि चार मोटारसायकली असा एकूण ३ लाख ७४ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अकलूज व पिलीव पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. सहायक पोलिस उपनिरीक्षक देशमुख, हेड कॉन्स्टेबल जाधव, गोरवे, मिरगणे, पोलिस हवालदार शंकर मरळे व नितीन लोखंडे यांच्या पथकाने हा छापा टाकला. या प्रकरणी माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पिलीव परिसरातील अवैध जुगार, मटका व इतर धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Marathi News Live Updates: ९० दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सोलापुरात परतीच्या पावसाची हजेरी, पहाटेपासून शहरात पावसाची संततधार

Vaishanavi Girse : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी', सासरच्या छळाला कंटाळून इंजिनिअर तरुणीने स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT