स्पाइन रोड, मोशी-प्राधिकरण - अमांनाकित गतिरोधक वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे.
स्पाइन रोड, मोशी-प्राधिकरण - अमांनाकित गतिरोधक वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. 
पुणे

पिंपरी-चिंचवड शहरात अवघे ११० गतिरोधकच नियमात

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात असलेले तब्बल एक हजारांहून अधिक गतिरोधक इंडियन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) मानांकनानुसार नाहीत. विशेष म्हणजे त्यांना पोलिस परवानाही घेतला नसल्याची माहिती खुद्द महापालिकेने दिली आहे. केवळ ११० गतिरोधक पोलिस परवानगीने तयार केले आहेत. परिणामी, अनेक गतिरोधक अपघातांना निमंत्रण देत आहेत.

शहर परिसरात अनेक ठिकाणी अनावश्‍यक गतिरोधक टाकण्यात आले आहेत. ते नियमानुसार नाहीत. त्यामुळे ते अपघाती ठरत आहेत. अनेकांना पाठ, मान, मणक्‍याच्या आजारासारख्या व्याधी जडल्या आहेत. 
अनेक ठिकाणी पाचशे मीटरमध्ये दहा-दहा गतिरोधक टाकले आहेत. चुकीच्या गतिरोधकांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पोलिस परवानगी न घेता गतिरोधक टाकल्याने पोलिसांनी महापालिकेवर कारवाई करणे अपेक्षित होते. गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती; परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

महापालिकेकडे शहरातील गतिरोधकाबाबत दिलेल्या माहितीनुसार ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील वाकड वाहतूक विभागाची परवानगी घेऊन २४, पिंपळे निलखमध्ये ४२ आणि पिंपळे सौदागरमध्ये एक असे ६७ गतिरोधक टाकले आहेत. आयआरसी मानांकनानुसार ६७, तर आयआरसी मानांकन नसलेले १२४ गतिरोधक टाकण्यात आले आहेत.

‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ४४४ गतिरोधक आहेत. त्यात वाहतूक पोलिसांची परवानगी घेऊन १४ गतिरोधक तयार केले आहेत. आयआरसी मानांकनानुसार ५९, तर उल्लंघन केलेले तब्बल ३८५ गतिरोधक आहेत. ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आयआरसी मानांकनानुसार ४०, तर उल्लंघन केलेले ७६ आहेत. विशेष म्हणजे एकाही गतिरोधकासाठी पोलिसांची परवानगी घेतलेली नाही.

फक्त ११० गतिरोधक अधिकृत
पोलिसांच्या परवानगीने शहरात केवळ ११० गतिरोधक टाकण्यात आले आहेत. त्यात सांगवी वाहतूक विभागात पाच, हिंजवडी ४४, निगडी २१, दिघी-आळंदी एक, तळवडे एक, भोसरी ११, चिंचवड २१, पिंपरी सात यांचा त्यात समावेश आहेत. शहरातील उर्वरित गतिरोधक अनधिकृत असल्याचे स्पष्ट होते.

अधिकारी मूग गिळून गप्प
आयआरसी मानांकनानुसार आणि सर्वच ठिकाणी पोलिस परवानगीने गतिरोधक टाकता येत नसल्याचे उत्तर महापालिकेचे अधिकारी देत आहेत. महापालिकेने अनेक ठिकाणी विनापरवानगी गतिरोधक तयार केल्याबद्दल पोलिसांकडून शून्य कारवाई केली जात आहे. एकूणच पोलिस व महापालिका प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याचे दिसून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT