पुणे

पिंपळे गुरव भागात पिछाडीवरून भाजपची मुसंडी

CD

‘ह’ क्षेत्रीय कार्यालय

पिंपळे गुरव, ता. १६ : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक २९, ३१ आणि ३२ मध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले. मतमोजणीच्या सुरुवातीच्या दहा फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार पिछाडीवर असल्याने संपूर्ण परिसरात काही काळ तणावपूर्ण शांतता पसरली होती. मात्र दहाव्या फेरीनंतर मतमोजणीचे चित्र झपाट्याने बदलले आणि भाजपच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केली.
पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक २९ मध्ये सुरुवातीच्या फेऱ्यांत भाजपचे दोन्ही उमेदवार पिछाडीवर असल्याने आमदारांच्या बालेकिल्ल्यातही निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अकरावी व बारावी फेरी पूर्ण होताच भाजप उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली. फेऱ्या वाढत गेल्या. तसतसा विजयाचा कल स्पष्ट होत गेला. निकाल निश्चित होताच परिसरातील वातावरणात बदल जाणवू लागला. कार्यकर्ते व समर्थकांचा उत्साह वाढला आणि लोक हळूहळू रस्त्यावर येऊ लागले.
दरम्यान, ‘ड’ व ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात निकालाच्या प्रतिक्षेत विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. निवडणूक आयोगाकडून फेरीनुसार माहिती वेळेवर न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. काही ठिकाणी पराभवाची बातमी समजताच क्षणार्धात स्मशान शांतता पसरली, तर विजयी उमेदवारांच्या ठिकाणी मर्यादित स्वरूपात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. अनेक नागरिक मोबाईल व दूरदर्शनसमोर निकाल पाहत होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने विजयी मिरवणुकांना परवानगी नाकारल्याने मोठा जल्लोष टाळण्यात आला.

शितोळे - ढोरेंत अटीतटीची लढत
जुनी सांगवी प्रभाग क्रमांक ३२ मध्ये ‘ड’ गटात भाजपचे प्रशांत शितोळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल शितोळे यांच्यातील अटीतटीच्या लढतीत सुरुवातीपासून १० व्या फेरीपर्यंत अतुल शितोळे आघाडीवर होते, तर शेवटच्या काही फेऱ्यात आघाडी घेत प्रशांत शितोळे २९० मतांनी विजयी झाले, तर ‘क’ गटातून भाजपच्या माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्वला ढोरे यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत माई ढोरे यांचा पराभव करत उज्वला ढोरे ‘जायंट किलर’ ठरल्या. अ गटातून भाजपच्या तृप्ती कांबळे व ब गटातून हर्षल ढोरे विजयी झाले.

क्षणचित्रे -
- ‘ड’ व ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
- फेरीनुसार माहिती उशिरा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
- पराभवाची बातमी समजताच काही ठिकाणी स्मशान शांतता
- विजयी उमेदवारांकडून मिरवणूक टाळत साध्या पद्धतीने आनंदोत्सव
- देवी-देवतांचे दर्शन घेऊन विजयी उमेदवारांकडून आभार व्यक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT