पिंपरी - महापालिकेची सध्याची इमारत.
पिंपरी - महापालिकेची सध्याची इमारत. 
पुणे

पिंपरी-चिंचवड महापालिका उभारणार नवीन इमारत

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कामकाजाच्या सोयीसाठी पाच मजली नवीन प्रशासकीय इमारत महापालिका खराळवाडी-गांधीनगर येथील महिंद्रा कंपनीलगतच्या आरक्षित भूखंडावर उभारणार आहे. त्यासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, वास्तुविशारद सल्लागाराची नियुक्ती केली आहे. 

पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि मोरवाडीतील अहल्यादेवी होळकर चौकालगत महापालिकेची सध्याची चार मजली इमारत उभी आहे. तिचे उद्‌घाटन १३ मार्च १९८७ रोजी झाले होते. त्यापूर्वी महापालिकेचे कामकाज खराळवाडीतील तीन मजली छोटेखानी इमारतीत सुरू होते. सध्याच्या इमारतीचे आठ वर्षांपूर्वी विस्तारीकरण करण्यात आले. तरीही इमारत अपूर्ण पडत आहे. चारपैकी तीन मजल्यांवर प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागांची कार्यालये आहेत. तिसऱ्या मजल्यावर स्थायी समिती सभागृह, महापौर दालन, पक्ष नेते, विरोधी पक्षनेते गट नेते, विविध विषय समित्यांचे कक्ष आहेत. 

जागेअभावी क्रीडा विभाग आणि एलबीटी कार्यालये अन्यत्र हलविण्यात आली आहेत. भविष्यात महापालिका क्षेत्राचा विस्तार झाल्यास आणखी कार्यालये व नवीन विषय समित्या स्थापन कराव्या लागणार आहेत. नोकरभरती करावी लागणार आहे. त्यामुळे सध्याची इमारत अपुरी पडणार असल्याने नवीन इमारतीची गरज आहे. 

नव्या इमारतीसाठी
सध्याच्या महापालिका भवनाजवळील महिंद्रा कंपनीलगतचा भूखंड औद्योगिक ते निवासी तत्त्वानुसार पालिकेच्या ताब्यात आला आहे. तिथे अद्ययावत पाच मजली इमारत उभारण्याचे नियोजन आहे. त्याविषयीचे कामे करण्यासाठी वास्तुविशारद नियुक्त करून निविदा काढण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गेल्या आठ जुलै रोजी मान्यता दिली आहे. यात कामाचे नकाशे तयार करणे, बांधकाम परवाने देणे, कामाचे अंदाजपत्रक करणे आदी कामांचा समावेश आहे. त्यासाठी लॅंडमार्क डिझाइन ग्रुपची वास्तुविशारद म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना निविदा रकमेच्या १.९० टक्के रक्कम देण्यात येणार आहे. त्यास स्थायी समिती सभेने मंजुरी दिली आहे. सध्याची व नवीन इमारत यांना जोडण्यासाठी स्काय वॉकची सुविधा असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT