पुणे

स्वयंघोषित बसथांबे जागोजाग, वाहतूक वेठीस मागोमाग !

CD

पिंपळे गुरव, ता. २४ ः पिंपळे गुरव परिसरातील रक्षक चौक, सांगवी फाटा, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव या मार्गांवर खासगी प्रवासी बसेसचे अक्षरशः स्वयंघोषित बसथांबे तयार झाले असून त्यामुळे वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे जुनी सांगवी पोलिस चौकीसमोरच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस सर्रास थांबत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून काळेवाडी फाटा, सांगवी फाटा, जुनी सांगवीचा माहेश्वरी चौक ते पिंपळे गुरवचा एम. एस. काटे चौक या दरम्यान दररोज सायंकाळी सात ते रात्री अकरा यावेळेत खासगी प्रवासी बस मोठ्या प्रमाणात उभ्या राहत आहेत. रस्त्याच्या कडेला थांबून त्यामधूनच प्रवासी चढ-उतार केले जातात. परिणामी, या उपनगरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होते आणि काही वेळा वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. वाहतूक पोलिस विभागाने तातडीने या अवैध प्रवासी थांब्यांवर कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

काय आहे स्थिती ?
- सांगवी फाटा मार्गे जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडीमधून प्रवेश करून मुख्य मार्गावर रहदारी
- अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, दुचाकी, रिक्षाचालक, पादचाऱ्यांना धोका
- रोज छोटे-मोठे अपघात, मात्र संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे

पोलिसांचा कानाडोळा
या मार्गावर वाहतूक पोलिस क्वचितच दिसतात. विशेष म्हणजे येथून वाहतूक पोलिस अधिकारी नियमित ये-जा करतात. तरीही उघडपणे सुरू असलेले अवैध प्रवासी थांबे त्यांच्या नजरेस कसे पडत नाहीत ?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही स्थानिकांनी तर या प्रकारामागे पोलिस प्रशासन आणि नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याची चर्चा सुरू असल्याचे सांगितले.

तक्रारी बेदखल
स्थानिक रहिवासी, व्यावसायिक आणि वाहनचालकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांच्या परिसरातच हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुणे शहरामध्ये खासगी प्रवासी बसना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे काही बसचालक पर्यायी मार्गांचा वापर करत आहेत. मात्र, कुठल्याही ठिकाणी अवैध थांबा घेतल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- सुदाम पाचोरकर, पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक शाखा

दररोज सायंकाळी या मार्गावरून जाणे म्हणजे मोठी कसरतच असते. खासगी प्रवासी बस रस्त्यातच उभ्या राहत असल्याने वाहतूक कोंडी होते आणि अपघाताचा धोका वाढतो. पोलिसांनी केवळ कारवाईची भाषा न करता प्रत्यक्षात कठोर पावले उचलावीत, अशी आमची अपेक्षा आहे.
- सुरेश निकाळजे, दुचाकीस्वार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT