पुणे

स्वाइन फ्लूचा 56 वा बळी 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरात स्वाइन फ्लूची साथ रोखण्यात महापालिका प्रशासनाला अपयश येत आहे. स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत 56 जणांचा बळी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात जुन्नर येथील 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला उपचारासाठी 20 सप्टेंबरला भोसरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याच दिवशी तिच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल 21 सप्टेंबरला मिळाला. त्यामध्ये स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या महिलेला पुढील उपचारासाठी चव्हाण रुग्णालयात हलविले. सोमवारपासून (ता. 9) ती कृत्रिम श्‍वासोच्छ्वासावर होती. मंगळवारी (ता. 10) उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. 

शहरात एक जानेवारीपासून आतापर्यंत चारशे रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यातील 334 जणांना उपचार करून सोडण्यात आले. दहा जणांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: लग्नासाठी सोनं घेणार? आधी ही बातमी वाचा! 20 हजारांनी महागलं सोनं; सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर? पाहा ताजा भाव

VIRAL VIDEO: इंग्लंडच्या स्टार गोलंदाजाला नाइटक्लबबाहेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?

Akola Online Vehicle Fraud: वाहन विक्रीच्या आमिषाने ९.९० लाखांची फसवणूक: नागपुरातून आरोपी जेरबंद; फसवणुकीतील एक लाख गोठविले

Marathi News Live Updates : पंढरपूरमध्ये अचानक भाविकांची गर्दी वाढली

Hockey World Cup : भारत-अर्जेंटिनामध्ये आज लढत रंगणार; हरमनच्या सेनेचा दुसऱ्या फेरीतील अखेरचा सामना

SCROLL FOR NEXT