पुणे

पिंगोरी परिसरात बिबट्याची दहशत

CD

वाल्हे, ता. १४ : पिंगोरी (ता. पुरंदर) येथील कवडेवाडी-साकुर्डे घाट रस्त्यावर बुधवारी (ता. १३) रात्री दहाच्या सुमारास बिबट्या आणि त्याच्या बछड्याचे दर्शन झाले. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पिंगोरी येथील ओंकार सुतार हे बुधवारी रात्री चारचाकीने साकुर्डेमार्गे घरी येत असताना, घाटात त्यांना रस्त्यालगत बिबट्या व बछडा दिसला. गाडीच्या प्रकाशात काही वेळ हे प्राणी रस्त्यावरच वावरत होते. सुतार यांनी प्रसंगावधान राखून मोबाईलमध्ये याचे चित्रीकरण केले व ग्रामस्थांना सतर्क केले. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी वर्गात भीती आहे. डोंगरभागातील पाणीसाठे आटल्याने बिबटे मानवी वस्तीकडे वळत असल्याचे उद्योजक महादेव कदम यांनी सांगितले.

दरम्यान, रात्रीच्या वेळी या घाटातून दुचाकी प्रवास टाळावा, असे आवाहन सरपंच संदीप यादव यांनी केले आहे. वनविभागाने या भागात तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी सरपंच जीवन शिंदे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ : मुंबई, लातूरची विजयी घोडदौड सुरू, अटीतटीच्‍या लढतीत पुण्याची नाशिकवर मात

No Vehicle Day : पंतप्रधानांच्या आवाहनाला साद! महापौर शासकीय वाहन सोडून ई-स्कूटरने पोहोचल्या मनपात

Anand Paranjpe: राष्ट्रवादीचा 'आनंद' दुरावला! परांजपेंनी पक्षाला रामराम ठोकला; पण तडकाफडकी निर्णय नेमका का घेतला?

Sleep Death : आपण झोपेत खरंच मरतो का? विज्ञान काय सांगतं, जाणून घ्या रहस्य

IPL 2026 : जेमी ओव्हरटनची माघार, CSK च्या संघात दाखल झाला दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक ऑलराऊंडर! शेवटच्या टप्प्यात मजा येणार

SCROLL FOR NEXT