Bhaje Caves sakal
पुणे

Bhaje Caves : पुणे परिसर दर्शन : भाजे लेणी

पुणे ते लोणावळा प्रवासात लोणावळ्या आधीचे रेल्वे स्टेशन म्हणजे मळवली. इथून थोड्याच अंतरावर भाजे हे गाव आहे. भाजे गावापासून चारशे फूट चढून गेल्यावर सुप्रसिद्ध भाजे लेणी आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे ते लोणावळा प्रवासात लोणावळ्या आधीचे रेल्वे स्टेशन म्हणजे मळवली. इथून थोड्याच अंतरावर भाजे हे गाव आहे. भाजे गावापासून चारशे फूट चढून गेल्यावर सुप्रसिद्ध भाजे लेणी आहेत.

पुणे ते लोणावळा प्रवासात लोणावळ्या आधीचे रेल्वे स्टेशन म्हणजे मळवली. इथून थोड्याच अंतरावर भाजे हे गाव आहे. भाजे गावापासून चारशे फूट चढून गेल्यावर सुप्रसिद्ध भाजे लेणी आहेत. भारत सरकारने हे स्मारक संरक्षित केलेले आहे. ही लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात खोदलेली असावीत, कारण यात पाण्याच्या टाक्यांजवळ ब्राम्ही शिलालेख कोरले आहेत. जे या लेण्यांचा काळ दर्शवितात. या लेणी समूहात २२ लेण्यांचा समूह आहे. सर्व लेणी बौद्ध असून हिनयान पंथाची आहेत. येथे एक चैत्यगृह आणि बाकीचे विहार आहेत.

चैत्यगृह म्हणजे प्रार्थनेची जागा, भव्य अशा या चैत्यगृहात २७ अष्टकोनी दगडी खांब आहेत आणि त्यावर लाकडी तुळया किंवा फासळ्या आहेत. या फासळ्या सुद्धा लेण्या इतक्याच प्राचीन आहेत. कारण, त्यातल्या एका फासळीवर ब्राम्ही शिलालेख कोरलेला आहे. चैत्यगृहात मोठा दगडी स्तूप आहे. त्यावर दगडी हरमिका म्हणजे पेटी आहे. ज्यामध्ये ज्या महत्त्वाच्या व्यक्तीचे स्मारक म्हणून ही लेणी खोदली, त्याच्या अस्थी आणि आठवणीच्या इतर गोष्टी ठेवल्या जातात. इतर विहारांमध्ये बरेच स्मारक स्तूप आहेत. महत्त्वाच्या व्यक्तींची आठवण म्हणून हे सूप तयार केले जातात. शेवटचे सूर्य लेणे हे बौद्ध नसावे असे काही अभ्यासकांचे मत आहे.

कारण, हीनयान पंथाच्या लेण्यांमध्ये मानवी आकृती कोरल्या जात नाहीत. पण या शेवटच्या लेण्यात अनेक मानवी आकृती किंवा देव देवता कोरल्या आहेत. यात चार अश्वांच्या रथावर बसलेली एक मूर्ती आहे. ती सूर्यमुर्ती असावी तसेच या सूर्याबरोबर दोन स्त्रिया सुद्धा दाखवलेल्या आहेत. सूर्य आणि इंद्र यांचा हा प्रसंग असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. सूर्याच्या रथा खाली काही असूर तुडवले जात असल्याचे दाखवले आहे. असे असले तरी याबद्दल इतर अनेक अंदाज आणि मतप्रवाहही आहेत.

यात तबला वाजवताना एक स्त्री दाखवली आहे, त्यामुळे तबला हे भारतीय वाद्य असून ते अति प्राचीन आहे हे सिद्ध होते. पावसाळ्यामध्ये या परिसराच्या आजूबाजूला पाण्याचे छान सुंदर धबधबे असतात आणि पर्यटक मंडळींना पाण्याच्या धबधब्यांचा आनंद घेता येतो.

काय पहाल?

२२ लेण्यांचा समूह, त्यातील चैत्यगृहामधील भव्य कोरीवकाम, त्याचा मोठा स्तूप, विहारांमध्ये असलेली गवाक्ष, त्याच्यामध्ये जाळीचे पडदे आणि वनस्पती वगैरे कोरलेले आहेत, मोठे मोठे स्मारक स्तूप पाहता येतील, शेवटच्या लेण्यांमधील सूर्यमुर्ती त्याच्यानंतर इतर अनेक मूर्ती. तबला वाजवणारी स्त्री

कसे जाल?

पुण्याहून मळवली स्टेशनला लोकलने जाऊन तिथून चालत किंवा रिक्षाने भाजे गावात जाता येते. भाजे गावातून चारशे फूट चढून गेल्यानंतर भाजे लेणी आहे. या समूहाला प्रवेश शुल्क आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT