Shaniwar Wada
Shaniwar Wada sakal
पुणे

Shaniwar Wada : पुणे परिसर दर्शन : पुण्याची शान शनिवारवाडा

सकाळ वृत्तसेवा

पेशव्यांमुळे मराठी राज्याचे साम्राज्यात रूपांतर झाले आणि साहजिकच पुण्याला राजधानीचा दर्जा मिळाला.

पेशवाईचे बस्तान बसवण्याआधीच बाळाजी विश्वनाथ यांचे अकाली निधन झाले आणि त्यांचा थोरला मुलगा बाजीराव विसाव्या वर्षी पेशवा झाला. सुरुवातीला त्यांनी सगळा कारभार सासवड येथूनच बघितला; पण नंतर पुणे हे गाव वंशपरंपरागत इनाम मिळाल्याने इथे राहण्याची त्यांची इच्छा बळावली. लाल महालाच्या जोत्यांना आग्नेयस ठेवून जागा निश्चित केली आणि काम चालू केले. दोन वर्षांत वाडा पूर्ण करून शके १६५३ च्या रथसप्तमीस म्हणजे २२ जानेवारी १७३२ रोजी वाड्याची वास्तुशांत करून बाजीराव मुक्कामी आले.

वाड्याला नऊ बुरुज असलेला जो तट आहे तो बांधण्यास शाहू महाराजांनी परवानगी नाकारली, त्यामुळे सध्याची तटबंदी बाजीरावांचे चिरंजीव नानासाहेब पेशवे यांनी १७५० मध्ये बांधली. त्याचबरोबर त्यांनी वाड्याची व्याप्ती वाढवली आणि साध्या लहान वाड्याचे रूपांतर भव्य तीन मजली दोन चौकी वास्तूंमध्ये झाले. ज्यात रघुनाथराव आणि सदाशिवराव हे बंधू तसेच विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव या चिरंजीवांची निवासस्थाने तसेच मेघडंबरी, चिमणबाग, रंगमहाल, हजारी कारंजे अशी देखणी कामे चालू होती.

पेशव्यांमुळे मराठी राज्याचे साम्राज्यात रूपांतर झाले आणि साहजिकच पुण्याला राजधानीचा दर्जा मिळाला. त्यामुळे वाड्यात महाल, रत्नागार, देवघरे, पोथीशाळा, जमादारखाना, जवाहिरखाना, शस्त्रागार, खलबत खाने, दफ्तरखाने, फडाच्या जागा, सदर, स्नानगृहे, भोजनगृहे आणि स्त्रियांच्या वावराच्या जागा अशी बांधकामे झाली. साधारण आठ-नऊशे माणसांचा वावर या वाड्यात होत असे. तीन मजली बांधकाम त्यावर गच्ची आणि गच्चीच्या चार कोपऱ्यांत चार खोल्या (ज्याला ‘बंगली’ असे म्हणत) असे काम झाले. पुढे सवाई माधवराव यांच्या काळात आरसे महाल बांधला. हा दिमाखदार वाडा १८२८ मध्ये इंग्रज अमलाखाली लागलेल्या आगीत भस्मसात झाला.

काय पहाल

प्रवेशद्वारापासून देखणा असलेला वाडा बघताना जुने वैभव काय असेल ते डोळ्यासमोर येते. पूर्ण तटावरून फेरी मारता येते. प्रवेशद्वाराच्या वर लाकडी खांबांनी आणि जाळीने सजलेला नगारखाना आहे. इथून वाड्याची भव्यता लक्षात येते आणि मन क्षणात भूतकाळात जाते.

  • इथे रोज (मंगळवार सोडून) लाइट अँड साउड शो करण्यात येतो.

  • वेळ : संध्याकाळी ७

  • शुल्क : पन्नास रुपये

  • वाडा बघण्यासाठी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत खुला असतो

  • शुल्क : वीस रुपये

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT