पहाटेच्या आकाशात पूर्वेकडे सध्या ग्रहांचे संमेलन भरत आहे. sakal
पुणे

पुणे : पहाटेच्या आकाशात पाहा ग्रहांचे संमेलन

ग्रहांची युती म्हणजे काय.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: पहाटेच्या आकाशात पूर्वेकडे सध्या ग्रहांचे संमेलन भरत आहे. अगदीच सूर्योदयापूर्वी आपल्या सर्वांना सूर्यमालेतील या अनोख्या घटनेचे साक्षीदार बनता येणार आहे. फक्त आवश्यकता आहे मोकळ्या जागेची आणि पहाटे लवकर उठण्याची...

संमेलनातील ग्रह..

सूर्यमालेतील गोलाकार कडे असलेला शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू ग्रहांची युती सध्या पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे येत्या शनिवार (ता. २३) व रविवारी (ता.२४) चंद्रही यामध्ये सामील होत आहे. या ग्रहांमध्ये सध्या शुक्र सर्वाधिक तेजस्वी आहे.

ग्रहांची युती म्हणजे काय...

सूर्यानंतर ओळीत सर्व ग्रह पाहिल्यास प्रथम बुध, शुक्र नंतर तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी येते. त्यानंतर मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो हे ग्रह आहेत. हे सर्व ग्रह आपापल्या कक्षेमध्ये सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात. सूर्य प्रदक्षिणा करताना कधीकधी हे ग्रह सूर्यासापेक्ष एका रेषेमध्ये येतात, या घटनेस युती असे म्हणतात. सध्या पूर्वेच्या आकाशात शनी, मंगळ, शुक्र आणि गुरूची युती झाली आहे.

कसे पाहणार?

उघड्या डोळ्यानेही आपल्याला ही युती दिसणार आहे. मोकळ्या जागेवरून किंवा टेरेसवरून हे संमेलन पाहता येणार आहे. शक्यता जिथे प्रकाश कमी आहे. अशा जागेची निवड करावी. तुमच्याकडे दुर्बीण असेल तर त्याहूनही उत्तम. सूर्याच्या प्रकाशामुळे ग्रहांच्या कला आणि शनीच्या कडाही तुम्ही पाहू शकता.

बालगंधर्वजवळ दुर्बिणींची व्यवस्था

ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरा जवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दुर्बिणींची व्यवस्था करण्यात येणार आहे. शनिवार (ता.२३) आणि रविवार (ता.२४) पहाटे चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे. कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT