Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra Modi 
पुणे

शरद पवारांबद्दल आदर, काँग्रेसने त्यांचा अपमान केला: मोदी

सकाळवृत्तसेवा

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. काँग्रेसने त्यांचा अनेकदा अपमान केला. त्यांना अध्यक्षपदासाठी संघर्ष करावा लागला. आता मात्र पुन्हा ते काँग्रेससोबत आहेत याचे दु:ख आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील बूथ कार्यकर्ते संपर्क अभियानात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी संवाद साधला. आज संवादाची सुरवात मराठीतून करत मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांनी अभिवादन केले. काँग्रेसला लक्ष्य करत आज त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती दाखवल्याने एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा होती.

शरद पवार यांच्याबद्दल आपल्याला व्यक्तिगत आदर आहे, मात्र पक्ष अध्यक्ष पदासाठी त्यांनी प्रयत्न केला तेव्हा काँग्रेसने त्यांचा अपमान करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ज्या काँग्रेसने त्यांना पक्षबाहेर काढले त्याच काँग्रेस सोबत आज पवारसाहेब पुन्हा गेले याचा खेद वाटत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT