PM Modi and Farmer Waghmare e sakal
पुणे

कसं काय ठीक आहे का? मावळच्या शेतकऱ्याशी मोदींचा मराठीत संवाद

शेती विषयक केलेल्या नविन तंञज्ञान व प्रयोगांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

सकाळ डिजिटल टीम

बेबडओहळ : नमस्कार, कसं काय.. ठीक आहे का? हो ठीक आहे. आता पहिले हे सांगा आपण शेतात कोणत्या नवीन गोष्टी करता ज्या ऐकून देशातील जनतेला चांगल्या वाटतील. हा संवाद आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मावळ तालुक्यातील एका शेतकऱ्याचा. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मावळ तालुक्यातील आढले बुद्रुक येथील शेतकरी बाळु नथु वाघमारे यांना मिळाली. आंबी येथील नोबेल एक्सचेंज या जैविक खताच्या केंद्राने त्यांना ही संधी प्राप्त करून दिली. शेती विषयक केलेल्या नविन तंञज्ञान व प्रयोगांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कसं काय ठीक आहे का अशी मराठीतून विचारणा करत त्यांनी संवादाला सुरवात केली. (PM Narendra Modi Talks with Pune Maval farmer conversation start in Marathi)

मोदी म्हणाले की, प्रथम आपण शेतीमध्ये करत असलेल्या अशा नवीन गोष्टींबद्दल सांगा की जे ऐकून देशातील जनतेला चांगले वाटेल. मोदींच्या या प्रश्नावर वाघमारे म्हणाले, मी शेतीमध्ये भात, हरभरा, सोयाबीन, वाटाणा, भुईमूग अशी पिके घेतो तर भाजीपाल्यांमध्ये भेंडी, मिरची, वांगी,गवार व इतर सर्व पिके घेत असतो. ही सर्व पिके घेत असताना जैविक खताचा अधिक वापर करतो. तळेगाव या ठिकाणी याचा मोठा प्लॅन्ट आहे, असे वाघमारे यांनी सांगितले.

यानंतर मोदी यांनी तुमच्या येथे इथेनॉल आणि बायोगॅसचा लाभ शेतक-यांना मिळत आहे. आपल्याला याचा कशा प्रकारे लाभ मिळाला. आपण त्या संदर्भात कसे जोडले गेले आहात असा दुसरा प्रश्न केला. यावर मी पुर्णत जैविक खताचा वापर करतो. पण तुम्ही तयार करता का ? दुसरीकडून आणता असा दुसरा प्रश्न पुन्हा विचारला असता,आम्हाला आमच्या येथेच जैविक खत उपलब्ध होत असल्याने आम्ही ते घेतो.याचा खर्चही कमी आहे.

आपल्या या जैविक पिकाबद्दल आपल्या परिसरातील नागरीकांना माहिती आहे का? ते स्वस्त आहे की महाग या विषयी विचारले जाते का? असे प्रश्न विचारले. यावर हो मला आता शेतकरी विचारतात कि जैविक खत कोठे मिळते तर मी त्यांना माहिती देतो व जैविक खत देखील देतो, असे वाघमारे यांनी सांगितले. आपल्याकडे सर्व मिळून शेती करतात का? महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो, असे वाघमारे यांनी सांगितले.

यावर मोदी म्हणाले की, मला आनंद होतो की तुम्ही तुमच्या परिवारातील महिलांनाही सोबत घेतले आहे. मी त्यांना प्रणाम करीत शुभेच्छा देतो. शेवटी कोरोना काळात सुरक्षित राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पंतप्रधान मोदी यांच्याशी साधलेल्या संवादाबद्दल शेतकरी वाघमारे म्हणाले की, खरं तर मला याची काही कल्पना नव्हती. कंपनीमध्ये गेलो असता मी शेतीत करत असलेल्या प्रयोगाबद्दल माहिती विचारण्यात आली. थेट देशाच्या पंतप्रधानांशी बोलण्याचा योग आला हे माझ्या दृष्टीने अतिशय भाग्याचे समजतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

Crime News : जुने नाशिक मधील मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा; देहविक्री व्यवसाय उघड, ५ महिलांची सुटका

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

SCROLL FOR NEXT