PMC PUNE Take Over 150 Bed in Private hospital for corona Patients.jpg 
पुणे

पुणे महापालिकेने खासगी हॉस्पिटलमध्ये दीडशे बेडस् घेतले ताब्यात

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना बाधितांसाठी महापालिकेने आता खासगी रुग्णालयांतील बेडस् ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सुमारे दिडशे बेडस् महापालिकेने ताब्यात घेतले असून, तर दोन ठिकाणी कोविड केअर सेंटर (सीसीसी) आजपासून सुरू केले आहेत.

कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने बेडसची संख्या कमी पडू लागली आहे. यापार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. या बैठकीत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकूण क्षमतेच्या पन्नास टक्के बेडस् राखीव ठेवण्यात यावेत, अशी सूचना आयुक्त विक्रम कुमार यांनी केली होती. त्यावर काही रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी नकारघंटा लावली होती. आयुक्तांनी दम भरल्यानंतर काही रुग्णालयांनी बेडस् उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली. त्यानुसार मंगळवारी खासगी हॉस्पिटलनी सुमारे दिडशे बेडस् उपलब्ध करून दिले गेले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तर ससून रुग्णालयातही ८० बेडस् वाढविण्यात आले आहेत. तर शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात आज आणखी दिडशे बेडसची भर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच रुग्णांची संख्या वाढत असल्याने सीसीसी सेंटर सुरू करण्यास सुरवात झाली आहे. हडपसर येथील बनकर शाळा आणि येरवडा येथील एका हॉस्टेलमधील सीसीसी सेंटर या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी तीनशे असे सहाशे बेडस् उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंजाब किंग्सच्या 'डिल' वर आर अश्विन खूपच प्रभावित; म्हणतोय, हा खेळाडू IPL 2026 मध्ये घुमशान घालणार

Crime News : मोफत पाणीपुरी देण्याची मागणी, नकार देताच चाकूने हल्ला; पाणीपुरी विक्रेत्याचा जागीच मृत्यू

Canada PR Without Job: कधी कॅनडात काम केले नाही? तरीही PR मिळू शकते; जाणून घ्या कसे

Education News: उच्च शिक्षणात क्रांती! परदेशी शिक्षणाचा खर्च वाचणार; भारतातच जागतिक विद्यापीठांचे वर्ग भरणार

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्यांना वाळू माफियांकडून धमकी

SCROLL FOR NEXT