पुणे

पुण्यात समान पाणीपुरवठ्यासाठी फेरनिविदा? 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : समान पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्या, साठवण टाक्‍या, नळजोडणी, मीटर बसविण्याची कामे रखडली आहेत, त्यामुळे पुणेकरांना नेमके कधी चोवीस तास पाणी मिळेल, प्रश्‍न आहे. दुसरीकडे, कराराप्रमाणे कामे न केल्याने जैन इरिगेशन कंपनीला दंड ठोठावला असून, तो वसूल करण्यात येणार आहे.

लोकांना समान व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 2 हजार 300 कोटी रुपयांची ही योजना राबविण्यात येत आहे. त्यातील बहुतांश कामांसाठी एल ऍण्ड टी आणि जैन इरिगेशनची नेमणूक झाली आहे. खोदाई करून सुमारे 1 हजार 750 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्याची जबाबदारी या कंपन्यांवर आहे. 

आजघडीला या योजनेतील 307 किलोमीटर वाहिन्या टाकण्याची कामे अपेक्षित असूनही केवळ 143 किलोमीटर वाहिन्या टाकल्या आहेत. त्यात जैन इरिगेशनने कामच सुरू केले नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे या कंपनीला दिलेली कामे काढून फेरनिविदा काढाव्यात, अशी सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला शुक्रवारी केली. 

आधीही दोनवेळा निविदा रद्द 
या योजनेचे काम 2022 पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा 2017 मध्ये करण्यात आली होती. मात्र, अजूनही पहिल्या टप्प्यातील कामांना हात न लागल्याने योजना कधी पूर्ण होणार, असा प्रश्‍न आहे. याआधी या योजनेच्या निविदा वादात सापडल्याने दोन वेळा रद्द करण्यात आल्या होत्या. 

अशी आहे योजना 
जलवाहिन्यांची लांबी 
1,750 किलोमीटर 
आतापर्यंत अपेक्षित काम 
309 किलोमीटर 
पूर्ण झालेले काम 
143 किलोमीटर 

पाण्याच्या टाक्‍या 
नियोजित ः 82 
पूर्ण ः 26 

पाणी मीटर ः 50 हजार 
बसविलेले मीटर ः 7 हजार 


नियोजनानुसार समान पाणीपुरवठा योजनेतील कामे व्हायला हवीत. मात्र, काही कामे न झाल्याने ठेकेदारांवर कारवाई केली जाईल. योजनेतील अडचणी दूर करून पुढील टप्प्यातील कामे वेळेत करण्यात येतील. कामे न केलेल्या कंपनीचे काम थांबवून फेरनिविदा काढण्याची सूचना केली आहे. 
- मुरलीधर मोहोळ, महापौर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT