PMP
PMP Sakal
पुणे

‘पीएमपी’च्या वर्धापनदिनी दरात सवलत

सकाळ वृत्तसेवा

पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) १५ वा वर्धापन १९ एप्रिल रोजी आहे. यानिमित्ताने ‘बस डे’ उपक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) (PMP) १५ वा वर्धापन (Anniversary) १९ एप्रिल रोजी आहे. यानिमित्ताने ‘बस डे’ (Bus Day) उपक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच, या दिवशी प्रवाशांना (Passenger) तिकीट दरात (Ticket Rate) सवलत (Concession) दिली जाणार आहे, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करून वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी करण्यास हातभार लावावा, असे आवाहन पीएमपीने केले आहे. ‘पीएमपी’च्या डेपोअंतर्गत क्रिकेट व कबड्डी स्पर्धा, वर्धापन दिन व क्रिकेट, कबड्डी स्पर्धांचे बक्षिस वितरण, महिला कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध खेळांचे आयोजन, प्रदर्शन बस तयार करून प्रत्येक बससेवेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, वाहतूक तज्ज्ञ, एनजीओ, प्रवासी मंच, ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत परिसंवाद, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन १८ ते २३ एप्रिलदरम्यान पीएमपीने केले आहे.

प्रवाशांसाठी सुविधा...

  • १८ एप्रिलला ‘बस डे’च्या दिवशी १,८०० बस प्रवाशांच्या सेवेसाठी

  • १८ एप्रिलला शहरामध्ये कोथरूड डेपो ते डेक्कन, स्वारगेट ते वडगाव धायरी फाटा, स्वारगेट ते शिवाजीनगर (बाजीराव/शिवाजी रस्तामार्गे), जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता या ५ मार्गांवर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली व स्वयंसेवकांच्या सहकार्याने डेडिकेटेड लेनद्वारे प्रवासीसेवा देणार

  • १९ एप्रिलला दोन्ही महापालिका हद्दीतील प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात किमान तिकीट दर ५ रुपये व कमाल तिकीट दर १० रुपये इतका राहील. पुण्यदशम बससेवा पूर्ण दिवस मोफत राहील. (दोन्ही महापालिका हद्दीबाहेरील चालू तिकीट दरात कोणताही बदल होणार नाही.)

  • दोन्ही महापालिका हद्दीमध्ये महिला प्रवाशांना दैनिक पास १० रुपयात संपूर्ण दिवस प्रवास करता येईल. (महापालिका हद्दीबाहेर कोणतीही सवलत राहणार नाही.)

अभिप्राय नोंदवा, बक्षीस मिळवा!

‘बस डे’च्या दिवशी पीएमपीच्या सुविधांचे माहिती पत्रक देण्यात येणार आहेत. त्यामध्ये लकी कुपन असणार आहे. प्रवाशांनी कुपनमध्ये स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर व पीएमपी सेवेबाबतचा अभिप्राय नमूद करावयाचा आहे. हे कुपन प्रत्येक बस व बसस्थानकामध्ये ठेवलेल्या बॉक्समध्ये जमा करावयाचे आहे. जमा होणाऱ्या कुपनांमधून लकी ड्रॉ काढून विजेत्या प्रवाशांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

Video: मुलं आजूबाजूला खेळतायेत अन् कपल्सचा पार्कच्या मधोमध 'रोमान्स'; व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

SCROLL FOR NEXT