PMP Bus
PMP Bus Sakal
पुणे

पीएमपी बसचालकाला चक्कर येऊन स्टेअरिंगवर पडले; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

अशोक बालगुडे

हडपसर-महंमदवाडी पीएमपी सुरू असताना बसचालक चक्कर येऊन स्टेअरिंगवर पडले. प्रसंगावधान राखत चालकाने चक्कर आल्याचे लक्षात येताच बस रस्त्याच्या बाजूला थांबविली.

उंड्री - हडपसर-महंमदवाडी पीएमपी सुरू असताना बसचालक चक्कर येऊन स्टेअरिंगवर पडले. प्रसंगावधान राखत चालकाने चक्कर आल्याचे लक्षात येताच बस रस्त्याच्या बाजूला थांबविली. बसमधील सर्व प्रवाशांनी बसचालकाचे आभार मानले. एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलसमोरी सकाळी ८.३०च्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली, असे येथील रिक्षावाल्यांनी सांगितले.

बसचालक तांबोळी असे बसचालकाचे नाव आहे.

हडपसर पीएमपी व्यवस्थापक समीर आत्तार म्हणाले की, मागिल चार दिवसांपूर्वी चक्कर आली होती. आज चक्कर आल्यानंतर नोबल हॉ़स्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर थोड्या वेळात बरे वाटले. त्यानंतर ते डेपोमध्ये आले. आता त्यांना कुठलाही त्रास नाही, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गणेश वाडकर म्हणाले की, चालकाला बसमधील स्टेअरिंगवरून उतरवून वाहकासह दोघांना रिक्षामध्ये बसवून नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविले. डॉक्टरांनी तातडीने उपचार केले. याचवेळी बस थांबल्याने महंमदवाडीतील दोन शाळकरी मुलांची अडचण पाहून तातडीने त्यांना शाळेत सोडले, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT