Bus
Bus 
पुणे

पीएमपीला मिळणार ‘ट्रॅक’

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा कशा देता येतील, पीएमपीच्या उत्पन्नाचे स्रोत कसे वाढविता येतील, बसच्या देखभाल-दुरुस्तीचे नियोजन डेपोनिहाय कसे करता येईल, मनुष्यबळाचा वापर योग्य पद्धतीने कसा करता येईल आदींबाबत मार्गदर्शक ठरेल असा पुढील पाच वर्षांसाठीचा ‘बिझनेस प्लॅन’ पीएमपीने तयार केला आहे. महिनाभरात त्याचे संचालक मंडळाला सादरीकरण होणार. त्यानंतर लगेचच अंमलबजावणीला सुरवात होणार आहे.

पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्यासमोर बिझनेस प्लॅनचे सादरीकरण झाले. ‘अर्नेस्ट आणि यंग’ (ई अँड वाय) या कंपनीने तो तयार केला आहे. पीएमपीने त्यात काही सुधारणा सुचविल्या आहेत. त्यानंतर महिनाभरात अंतिम आराखडा सादर करणार असल्याचे चारठणकर यांनी सांगितले.

महापालिका, स्मार्ट सिटी, मेट्रो, विमानतळ प्रशासन, एसटी महामंडळाशीही हा प्लॅन तयार करताना चर्चा केली आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांचा अंतर्भाव प्लॅनमध्ये केला आहे. तसेच संचालक मंडळाने मंजुरी दिल्यावर या आराखड्याची अंमलबजावणी करणार आहे. सुमारे दोनशे पानांचा हा प्लॅन आहे. 

सुमारे ११ लाख प्रवाशांची रोज वाहतूक करणाऱ्या पीएमपीने बिझनेस प्लॅन तयार करावा, अशी मागणी अनेक स्वयंसेवी संस्था करीत होत्या. ‘परिसर’ संस्थेने याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या योजनेतून महापालिकेने हा प्लॅन तयार करण्यासाठी आर्थिक साह्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT