Bus
Bus 
पुणे

पीएमपीचा ठेकेदारांना दणका

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वारंवार बंद पडणाऱ्या बसमुळे आर्थिक नुकसान होत असल्याने पीएमपी प्रशासनाने ठेकेदारांना चांगलाच दणका दिला. गेल्या चार महिन्यांत ठेकेदारांच्या ७७ बस ताफ्यातून काढण्यात आल्या. 

शहरात कोणत्याही भागातील रस्त्यांवरून गेले तर पीएमपीची एकतरी बस हमखास बंद पडून रस्त्याच्या बाजूला लावलेली दिसते. कधीकधी तर या बस रस्त्याच्या मध्यभागी बंद पडत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो.

पीएमपीच्या बसेस ब्रेक डाउन होण्याचे प्रमाण वाढल्याने या बसवर कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला होता. या सर्व प्रकारामुळे पीएमपीच्या कारभाराबाबत सर्वच स्तरांतून रोष व्यक्त केला जात आहे. 

पीएमपीच्या ताफ्यातील ३०८ बस ११ ते १२ वर्षांपासून वापरात आहेत; तर १०८ बस १२ पेक्षा जास्त वर्षांपासून रस्त्यांवर धावत आहेत. या जुन्या ४३० बस वारंवार बंद पडत असल्याने त्यांना भंगारात काढण्याचा निर्णय प्रशासनाने यापूर्वीच घेतला आहे. सध्या ठेकेदाराच्या ५७५ बस पीएमपीच्या ताफ्यात आहेत, यातील रोज ११० ते १२० बस विविध मार्गांवर बंद पडतात. 

ठेकेदाराने नादुरुस्त बस रस्त्यांवर आणू नयेत, अशा सूचना अनेकदा देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक नुकसान होते; तर प्रवाशांचे विनाकारण हाल होतात. त्यामुळे अशा बस पीएमपीच्या ताफ्यातूनच काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

ठेकेदारांच्या बस रस्त्यांत बंद पडल्यावर त्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. तरीही या बस दुरुस्त न करता पुन्हा मार्गांवर उतरविल्या जात असल्याने बस वारंवार बंद पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा ७७ बस गेल्या चार महिन्यांत भंगारात काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने ठेकेदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT