पुणे

रनिंग २५८ किलोमीटर, नोंद ४६९!

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बस धावली २५८ किलोमीटर अन्‌ पीएमपीच्या इंटलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममध्ये (आयटीएमएस) दिसते ४६९ किलोमीटर... असा प्रकार सध्या सुरू आहे. तसेच थांब्यांवर न थांबणाऱ्या बसच्या आकडेवारीमध्येही तफावत आढळल्यामुळे त्याबद्दल ठेकेदारांना करण्यात येणारा दंड सध्या थांबविण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. परिणामी, ‘आयटीएमएस’वरील ५२ कोटी रुपये पाण्यात जात असल्याची चिन्हे आहेत.

पीएमपीच्या बस कोणत्या मार्गावर किती धावतात, थांब्यांवर थांबतात का, वेग आदींवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने पीएमपी प्रशासनाने दोन्ही महापालिकांच्या सहकार्याने एप्रिल २०१५ मध्ये ‘आयटीएमएस’ प्रणाली कार्यान्वित केली. ‘एनईसी’ या कंपनीला त्याचे कंत्राट देण्यात आले. त्याअंतर्गत ७९० बसमध्ये जीपीएस बसविण्यात आले. तसेच शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील बीआरटीच्या ९४ थांब्यांवर एलईडी स्क्रीन उभारण्यात आले. ते बस आणि नियंत्रण कक्षाला जोडण्यात आले. त्यामुळे बसमधील प्रवाशांना पुढचा थांबा कोणता आणि थांब्यांवरील प्रवाशांना बस किती वेळेत येणार, याची माहिती मिळणे अपेक्षित होते; परंतु देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष, चोऱ्या आदी विविध कारणांमुळे ‘आयटीएमएस’ कार्यहीन होत गेली. 

‘आयटीएमएस’बद्दलच्या तक्रारींची शहनिशा करण्यासाठी प्रशासनाने १० बसद्वारे खात्री केली. त्यात मनपा ते तळेगाव दाभाडे (मार्ग क्र. १५९) मार्गावरील बस दिवसभरात २५८ किलोमीटर धावल्याची प्रत्यक्ष नोंद आहे. मात्र ‘आयटीएमएस’च्या रिपोर्टमध्ये ती ४६९ किलोमीटर धावल्याची नोंद झाली. उर्वरित ९ बसच्या बाबतीत प्रत्यक्ष धावल्यापेक्षा १० टक्‍क्‍यांनी अधिक नोंद आली आहे.  

पीएमपीच्या बस मोठ्या संख्येने थांब्यावर थांबत नसल्याचे ‘आयटीएमएस’च्या अहवालात म्हटले होते. त्यानुसार तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ठेकेदारांना लाखो रुपयांचा दंड केला होता. त्यांनी या बाबत न्यायालयात याचिका दाखल केली. नंतर लवाद बसवून समझोता करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर थांब्यावर बस न थांबविल्याबद्दल, ठेकेदारांना करण्यात येणारा दंड सध्या स्थगित करण्यात आला आहे. 

एनईसी कराराप्रमाणे काम करणे आवश्‍यक आहे. अन्यथा, त्यांच्यावर पुन्हा दंडात्मक कारवाई होऊ शकते किंवा त्यांचे कंत्राट रद्द होऊ शकते. ‘आयटीएमएस’मधील विसंगती दूर करण्यासाठी प्रशासनाने वारंवार नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. 
-अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT