PMP-Issues
PMP-Issues 
पुणे

#PMPIssues नफ्यातील मार्गांचे खासगीकरण नको

सकाळवृत्तसेवा

पुणे - पीएमपीच्या नफ्यातील मार्गांचे खासगीकरण कशासाठी करता, प्रयोगच करायचा असेल तर पुणे दर्शन, पुणे विमानतळ सेवा आणि आयटी हबसाठी करा, असे आवाहन स्वयंसेवी संस्था आणि तज्ज्ञांनी ‘सकाळ’च्या ‘फेसबुक लाइव्ह’मध्ये केले आहे. 

पीएमपीच्या तीन मार्गांवर फोर्स मोटार्सच्या एसी मिनी बस चालविण्याच्या भाजपच्या प्रस्तावावर पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे आणि सार्वजनिक वाहतुकीच्या अभ्यासक प्रांजली देशपांडे-आगाशे यांनी ‘सकाळ’च्या ‘फेसबुक लाइव्ह’मध्ये नुकतीच चर्चा केली. पीएमपीच्या नफ्यातील मार्गांवर प्रयोग करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. 

शितोळे म्हणाले, ‘‘पीएमपीची सेवा सुधारणे गरजेचे आहे. परंतु, त्यासाठी खासगीकरण हा एकमेव पर्याय नाही. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमांची आखणी केली पाहिजे. तसेच बसथांबे, वेळापत्रक, पंचिंग पास आदींमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. पीएमपीमध्ये खासगी ठेकेदारांचा अनुभव या पूर्वी चांगला नाही. त्यामुळे प्रयोग करण्यापूर्वी सारासार विचार करावा.’’

देशपांडे म्हणाल्या, ‘‘तिकिट-जाहिरातींचे उत्पन्न पीएमपीला मिळाले पाहिजे. त्यातून संबंधित कंपनीला प्रती किलोमीटर पैसे देण्याच्या पर्यायाचा विचार केला पाहिजे. फोर्सच्या प्रस्तावानुसार देशात फक्त रांचीमध्ये प्रयोग सुरू आहे. परंतु, तेथेही तो यशस्वी झालेला नाही. त्यामुळे या प्रयोगाबाबत फेरविचार केला पाहिजे.’’

प्रवाशांच्या सूचनांनुसार प्रस्तावात बदल करू
तीन मार्गांवर एसी मिनी बस सुरू केल्या म्हणजे पीएमपीचे खासगीकरण होणार नाही, तर प्रवाशांनी आणि पीएमपीने केलेल्या सूचनांनुसार प्रस्तावात बदल करण्यात येईल, अशी ग्वाही भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ‘सकाळ’ फेसबुक लाइव्हमध्ये दिली. महापालिकेला दाखल केलेला प्रस्ताव अंतिम नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांनी, तज्ज्ञांनी आणि पीएमपीने केलेल्या सूचनांनुसार त्यात बदल करण्यात येईल. दोन्ही शहरांमधील लोकसंख्येच्या प्रमाणात बसची संख्या वाढविण्यात येणार असून, त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. तसेच बस थांबे, वेळापत्रक, पीएमपीसाठी जागा आदी पायाभूत सुविधांकडेही लक्ष देण्यात येईल. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असाही दावा गोगावले यांनी केला. शहरातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी फोर्स मोटर्सच्या प्रस्तावाची  अंमलबावणी करून तर बघू, असे आवाहन गोगावले यांनी पुणेकरांना केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT