चिखली - एमएनजीएलच्या सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी पीएमपी बसची लागलेली रांग.
चिखली - एमएनजीएलच्या सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी पीएमपी बसची लागलेली रांग. 
पुणे

PMPML च्या 950 बसेस बंद पडणार?

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपीएमएल) सीएनजी पुरवठ्यापोटी सुमारे ३७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती न फेडल्यास नाइलाजास्तव पुरवठा बंद करावा लागेल. त्यास पीएमपी जबाबदार राहील,’’ असा इशारा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) दिला आहे, तर पीएमपी आणि एमएनजीएल यांच्यासाठी सीएनजी पुरवठा सुरू राहणे चांगले असून, थकीत मुद्दलाची रक्कम देऊ. व्याज देणार नाही, अशी पीएमपी प्रशासनाने भूमिका घेतली आहे.

पीएमपीच्या ताफ्यात सध्या सुमारे दोन हजार बसगाड्या असून, त्यापैकी ९५० बस सीएनजीवर धावतात. त्यांना एमएनजीएलकडून सीएनजीचा पुरवठा केला जातो.

एमएनजीएलचे संचालक (व्यवसाय) संतोष सोनटक्के म्हणाले, ‘‘पीएमपीला रोज ३० लाख रुपये किमतीचा १२ हजार किलो सीएनजीचा पुरवठा आम्ही करतो. महिन्याला १० कोटी रुपयांच्या सीएनजीची विक्री करतो. पीएमपीकडून दर महिन्याला त्या मोबदल्यात चार ते पाच कोटी रुपये अदा केले जातात.

उर्वरित रक्कम शिल्लक ठेवले जातात. त्यामुळे थकबाकी वाढत आहे. ४३ कोटी ३० लाख रुपयांच्या थकबाकीपैकी पीएमपीने सहा कोटी २२ लाख रुपये अदा केले आहेत. या संदर्भात पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालिका, संचालक मंडळ-पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आदींना वेळोवेळी पत्राद्वारे कळविले आहे. मात्र, त्यावर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे सीएनजी पुरवठा नाइलाजास्तव थांबवावा लागेल.’’

एमएनजीएलकडून थकबाकी भरण्याबाबत नोटीस मिळाली आहे. पैसे देण्याची व्यवस्था करत आहोत. सीएनजी खरेदी-विक्रीचा व्यवहार पीएमपी आणि एमएनजीएल या दोघांचीही गरज आहे. त्यामुळे सीएनजी पुरवठा सुरू ठेवणे चांगले. 
- अजय चारठाणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT