पुणे

पुणे :..म्हणून पीएमपीएमएल कामगारांनी खासदार काकडेंचे मानले आभार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीएमपीएमएलमधील बदली व हंगामी असलेल्या 1411 कामगार कायम करण्याचा निर्णय संचालक मंडळाने आज घेतला. यामुळे नोकरीत कायम झालेले पीएमपीएमएलचे हे चालक, वाहक, फिटर व सफाई कामगार यांच्या आयुष्यातील आजचा दिवस अतिशय आनंदाचा ठरला. भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी या कामगारांना कायम करण्यासंंदर्भात पाठपुरावा केला होता. खासदार काकडे यांच्यामुळे नोकरीत कायम झाल्यामुळे राष्ट्रवादी कामगार युुुनियनच्या कामगारांनी खासदार संजय काकडे यांचा आज सत्कार केला व त्यांचे आभार मानले.

पीएमपीएमएलमधील 1372 कामगार नोकरीत कायम करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सर्वच 1411 कामगारांना नोकरीत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2018 च्या दिवाळीपूर्वी खासदार संजय काकडे यांनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांची भेट घेऊन सर्व कर्मचारी वर्गाला दिवाळीपूर्वी बोनस मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर या हंगामी व बदली कामगारांना नोकरीत कायम करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे आज नोकरीत कायम झाल्यावर कामगारांनी खासदार संजय काकडे यांचे त्यांच्या कार्यालयात येऊन त्यांचा सत्कार करून आभार मानले. 

तत्पूर्वी, पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली. यावेळी पीएमपीएमएल चे संचालक शंकर पवार यांच्या हस्ते नोकरीत कायम केल्याचे पत्र कामगारांना देण्यात आली. याप्रसंगी पीएमपीएमएलच्या अध्यक्षा नयना गुंडे, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने व पिंपरी चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी आदी मान्यवर उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT