लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम करण्यास पोलीस प्रशासनाचा नकार sakal
पुणे

लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम करण्यास पोलीस प्रशासनाचा नकार

लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम करण्यास स्थानिक पोलीस प्रशासन परवानगी देत नसल्याने फडमलक हतबल: जाधव

रवींद्र पाटे

नारायणगाव : लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम खुल्या मैदानात करण्यास राज्याच्या मदत पुनर्वसन विभागाने परवानगी दिली आहे.या बाबतचे परिपत्रक पोलीस महासंचालक यांनी काढले आहे. मात्र लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम करण्यास स्थानिक पोलीस प्रशासन परवानगी नाकारत आहेत.या बाबत वरीष्ठ पातळीवर निर्णय न झाल्यास या भूमिकेच्या निषेधार्थ १५ डिसेंबर २०२१ रोजी राज्यातील तमाशा फडमलक व कलावंत कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळा जवळ जमा होतील. असा इशारा मराठा तमाशा लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष संभाजी जाधव यांनी दिला आहे.

या बाबत अध्यक्ष जाधव यांनी प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे.लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम खुल्या मैदानात करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. या बाबतचे परिपत्रक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी पोलीस महासंचालक यांनी काढून जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पाठवले होते. या मुळे लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम करण्याची तयारी राज्यातील तंबूच्या फडमलकांनी केली. मात्र लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम करण्यास तालुक्यातील स्थानिक पोलीस प्रशासन परवानगी देत नाही.

परवानगीसाठी केलेल्या अर्जाची पोच सुद्धा फडमलकांना दिली जात नाही.का परवानगी नाकारली या बाबतचे कारण सुद्धा सांगितले जात नाही.या बाबत नुकतीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची फडमलकांनी भेट घेतली. त्या नंतर राज्याचे पोलीस महासंचालक यांनी २ डिसेंबर २०२१ रोजी सुधारित परिपत्रक काढून पश्चिम, उत्तर महाराष्ट्र, ठाणे जिल्हा, खानदेश, विदर्भ, मराठवाडा आदी भागात लोकनाट्याचे कार्यक्रम करण्यास परवानगी दिली.मात्र त्या नंतर सुद्धा राज्यातील तालुका स्तरीय पोलीस ठाण्यातुन परवानगी नाकारली जात आहे. या मुळे राज्यातील फडमालक व कलावंत मानसिक तणावाखाली आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षे लोकनाट्य कार्यक्रम बंद असल्यामुळे फडमालक व कलावंत उपासमारीचे जीवन जगत आहेत. सध्यस्थीतीत राज्यात राजकीय कार्यक्रम, विविध आंदोलने, मोर्चे, विवाह सोहळे धुमधडाक्यात सुरू असताना फक्त लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम करण्यास परवानगी दिली जात नाही.याचा निषेध करण्यासाठी राज्यातील फडमलक व कलावंत १५ डिसेंबर २०२१ रोजी कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळा जवळ जमा होणार आहेत.या वेळी लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम करण्यास परवानगी देता येत नसेल तर आम्हाला आत्मदहन करण्याची परवानगी द्या.अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT