crime news sakal media
पुणे

चोरीच्या रिक्षाचा वापर करुन प्रवाशांची लुटमार, पोलिसांकडून एकास अटक

रिक्षातुन प्रवाशांना सोडण्याचा बहाणा करुन निर्जनस्थळी किंवा अंधाराच्या ठिकाणी नेऊन प्रवाशांना लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

रिक्षातुन प्रवाशांना सोडण्याचा बहाणा करुन निर्जनस्थळी किंवा अंधाराच्या ठिकाणी नेऊन प्रवाशांना लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली.

पुणे - वेगवेगळ्या ठिकाणांहून रिक्षा (Rickshaw) चोरुन, त्याच रिक्षातुन प्रवाशांना सोडण्याचा बहाणा करुन निर्जनस्थळी किंवा अंधाराच्या ठिकाणी नेऊन प्रवाशांना लुटणाऱ्या (Passenger Loot) एका सराईत गुन्हेगाला फरासखाना पोलिसांनी (Police) अटक केली. तर त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींनी शहराच्या वेगवेगळ्या भागात प्रवाशांना लुटल्याच्या घटना घडल्या असून विविध पोलिस ठाण्यात पाच गुन्हे (Crime) दाखल केले. पोलिसांनी चोरट्यांकडून रिक्षा, दुचाकी, मोबाइल असा पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

अभिषेक बाळू ससाणे उर्फ अभिषेक मनोज पाटील (वय 20, रा. जयभवानीनगर, कोथरूड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी ससाणेच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडीलांनी वाढदिवसासाठी खासगी ट्रॅव्हल्समधून गावावरुन पाठविलेल्या वस्तु घेण्यासाठी जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह त्याच्या मित्राला मागील रविवारी रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने लुटले होते. त्यांच्या मोबाईलमधील ऍपद्वारे काही रक्कम स्वतःच्या मोबाईल अपॅवर वर्ग केली होती. हि घटना मंगळवार पेठेत घडल्याने विद्यार्थ्यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन फरासखाना पोलिस आरोपींचा शोध घेत होते.

दरम्यान, पोलिसांकडून तांत्रिक विश्‍लेषण करुन आरोपीचा शोध घेतला जात होता. बॅंका बंद असल्याने आरोपीने पैसे वर्ग केलेल्या बॅंक खात्याची माहिती मिळविण्यास पोलिसांना अडचण येत होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षावरील क्रमांकावरुन चालकाचा शोध घेण्यात आला. दरम्यान, चोरट्यांनी ज्या एटीएम केंद्रातुन पैसे काढले होते, त्याबाबतची माहितीही उपलब्ध झाली. त्याआधारे रिक्षाचा शोध घेण्यात आला. मात्र संबंधित रिक्षा हा कोथरुड येथून काही दिवसांपुर्वी चोरीला गेल्याचे तपासामध्ये उघड झाले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी कोथरुड परिसरात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी एका आरोपीस अटक केली. तसेच त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेतले.

आरोपी वेगवेगळ्या भागात रिक्षाची चोरी करून, त्याच रिक्षाद्वारे लुटमारीच्या घटना उघडकीस आला. ससाणेला कोथरूड परिसरात सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. आरोपी ससाणे हा चोरीच्या रिक्षाचा वापर लुटमारीचे गुन्हे करीत असल्याचे तपासात उघड झाले. आरोपींनी लक्ष्मी रस्ता, विश्रांतवाडी, कोथरुड, शिवाजीनगर येरवडा येथे लुटमारीचे गुन्हे केले असून संबंधित ठिकाणी यापुर्वीच गुन्हे दाखल झालेले आहेत.या प्रकरणाचा तपास पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शेटे, सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, मेहबूब मोकाशी, मोहन दळवी, रिजवान जिनेडी, सचिन सरपाले, तुषार खडके, महावीर वलटे यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT