Pune police sakal
पुणे

रांजणगावात ३० लाखांचा गांजा जप्त

गांजाची बेकायदा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सापळा लावून पकडले.

सकाळ वृत्तसेवा

शिरूर : रांजणगाव एमआयडीसी (MIDC) परिसरात गांजाची बेकायदा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना रांजणगाव (Ranjangaon) एमआयडीसी पोलिसांनी (police) सापळा लावून पकडले. त्यांच्याकडून सुमारे तीस लाख रुपये किंमतीचा तब्बल १५० किलो गांजा व गांजाची बेकायदा वाहतूक करण्यासाठी वापरलेली पाच लाख रुपये किमतीची मोटार पोलिसांनी जप्त केली.

गांजाच्या बेकायदा वाहतूक व विक्रीप्रकरणी किरण आजिनाथ गायकवाड (वय २९) व मौलाना सत्तार शेख (वय २७, दोघेही रा. जामखेड, जि. नगर) यांना अटक केली असून, त्यांनी हा गांजा साखराबाई आबा पवार (वय ३०) व अंबिका साहेबराव गायकवाड (वय ३५, दोघी रा. परीटवाडी, ढोकसांगवी, ता. शिरूर) यांना विकणार असल्याची कबुली दिल्याने चौघांच्या विरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी दिली.

रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे यांच्या नेतृत्वाखालील संतोष औटी, वैभव मोरे, विलास आंबेकर, ज्ञानेश्‍वर शिंदे, भाग्यश्री जाधव, उमेश कुतवळ, विजय शिंदे, मनिषा घुले या पोलिस पथकाने मंगळवारी (ता. २४) रात्री साडेनऊच्या सुमारास ही मोठी कारवाई केली. अटक केलेल्या गायकवाड व शेख याला शुक्रवारपर्यंत (ता. २७) पोलिस कोठडी मिळाली असून, त्यांना पकडल्याची कुणकूण लागताच पवार व गायकवाड या संशयित महिला पळून गेल्या.

त्यांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना केल्या आहेत. या कारवाईवेळी परीटवाडी परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असलेली मोटार पोलिसांनी चोहोबाजूने घेरून ताब्यात घेतली. झडती घेतली असता या मोटारीत १५० किलो गांजा आढळून आला. गांजाचे प्रत्येकी दोन किलोचे बॉक्‍स तयार करून ते पोत्यांमध्ये भरलेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Relief: प्रति कोंबडी १०० रुपये, विहिरीत गाळ गेलेल्यांना किती रुपये? संपूर्ण नुकसानभरपाई समजून घ्या

Maharashtra Flood Relief: कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने किती मदत केली? शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे पडणार

Stock Market Closing: शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी वधारला; सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : राज्य सरकार विरोधात बच्चू कडू यांचा रास्ता रोको आंदोलन सुरू

Viral Video: ट्रेनमध्ये चहा विकता विकता तो झोपी गेला अन् तेवढ्यात... माणुसकीचे दर्शन घडविणारा हृदस्पर्शी व्हिडिओ

SCROLL FOR NEXT