police complaint against cut tree branches 10 thousand fine pune crime police sakal
पुणे

Pune : झाडाचे कटींग, फांद्या टाकणार्‍या विरुद्ध पोलिसात तक्रार, १० हजार दंड

सातारा रस्त्यावरील लोक शाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या मागील रिकाम्या जागेत झाडाचे कटींग

सकाळ वृत्तसेवा

बिबवेवाडी : सातारा रस्त्यावरील लोक शाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या मागील रिकाम्या जागेत झाडाचे कटींग, फांद्या टाकणार्‍या विरुद्ध मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांकडून बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने दहा हजार रुपये दंड वसूल केला.

अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या परिसरात रात्रीच्या वेळी नारळमित्र युटीलिटी सर्विसेस, कोथरूड पुणे यांचा खाजगी टेम्पो मधून झाडांचे कटिंग, फांद्या टाकत असल्याबाबत तेथील नागरिक अभिजित टेंबेकर यांनी प्रभागाचे आरोग्य निरीक्षक शब्बीर शेख यांना फोनवरून कळविले.

त्यानुसार त्वरित सदर तक्रारीची दखल घेत आरोग्य निरीक्षक शब्बीर शेख व मोकादम सुनील पाटोळे हे घटनास्थळी येऊन सदर टेम्पो ताब्यात घेऊन क्षेत्रीय कार्यालय येथे जप्त करून लावण्यात आला.

त्याच वेळेस सदर टेम्पो मालक हे क्षेत्रीय कार्यालय येथे येऊन टेम्पो जप्त केल्याबाबत आरोग्य निरीक्षक व मोकादम यांच्याशी वाद घालत आरोग्य निरीक्षक यांचे ओळखपत्र व मोबाईल हिसकावून घेतला. सदर घटनेबाबत आरोग्य निरीक्षक पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला जात असताना त्यांची गाडी अडवून अरेरावीची भाषा करण्यात आली.

याबाबत महापालिका सहाय्यक आयुक्त प्रकाश पवार व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विक्रम काथवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे सदर टेम्पो मालक यांचे विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली असून सदर टेम्पो मालकावर दंडात्मक कारवाई करून सदर टेम्पो मालकाकडून दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. अभिजित टेंबेकर यांनी केलेल्या सहकार्य व सतर्कतेबाबत महापालिका सहाय्यक आयुक्त बिबवेवाडी कार्यालय कडून आभार मानण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT