police complaint over Threats to students who petition court regarding MPSC exam answer key  Sakal
पुणे

पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमक्या; पोलिसांत तक्रार दाखल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची काही दिवसांपूर्वी झालेली संयुक्त पूर्व परीक्षा गट क देणाऱ्या विद्यार्थ्यांना धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थांनी उत्तरतालिकेतील काही चुकांबाबत कोर्टात याचिका दाखल केली होती, यानंतर इतर विद्यार्थ्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत.

संयुक्त पूर्व परीक्षा गट क या परिक्षेच्या निकाला प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना काही विद्यार्थ्यांकडून याचिकाकर्त्यांना धमकी आणि सोशल मीडिया वरुन शिवीगाळ करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे, या संबंधी याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून सदर विद्यार्थ्यांनी पुण्यातील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली आहे.

संयुक्त पूर्व परीक्षा गट क देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची उत्तरतालिका चुकीच्या आल्याने यावर आक्षेप घेत कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामुळे संयुक्त मुख्य परीक्षा गट क ची आगामी परीक्षा न्यायलाय प्रक्रियेमुळे रखडली. याचमुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या इतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून याचिका दाखल केलेल्या विद्यार्थ्यांवर दबाव टाकला जात आहे. तसेच त्यांना सोशल मिडीयावर शिवीगाळ करत धमक्या दिल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आज निघणार विनापरवाना दुचाकी रॅली! सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनीच नाकारला पोलिसांचा नियम; शांतता कमिटीचे सदस्यच आयोजक

Glenn Maxwell ने बनवली भारत, ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंडची मिळून ODI XI; पण एकाही इंग्लिश खेळाडूला स्थान नाही, 'या' भारतीयांची निवड

Maharashtra Floods : पाचच जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल अंतिम, दिवाळीपूर्वी मदतीवर सावट; ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

जनसंपर्क, भ्रमंती आणि संस्कृतीचे दर्शन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT