पुणे

मजुरांना पोलिस, जिल्हा प्रशासनाची मदत; मध्य प्रदेशात पाठविण्याची केली व्यवस्था

अविनाश पोफळे : सकाळ वृत्तसेवा

पुणे - ठेकेदाराने मजुरांकडे दुर्लक्ष केले. जेवण, अन्न-धान्यांची मदत न करता त्यांना वाऱ्यावर सोडले. मात्र, पोलिस, जिल्हा प्रशानाचे अधिकारी, कर्मचारी या मजुरांच्या मदतीला धावले. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी, अधिकारी आपला जीव धोक्यात घालून खडकवासला भागात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी दिवस-रात्र काम करीत आहेत. आज धायरी, नांदेड, किरकिटवाडी आदी खडकवासला भागातील सुमारे २५० मजुरांना नांदेड सिटी गेटपासून बसेसद्वारे पुणे स्टेशन येथे नेण्यात आले. तेथून त्यांना रेल्वेद्वारे मध्यप्रदेश येथे पाठविण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खडकवासला येथील मंडल अधिकारी रोहिदास जाधव म्हणाले,‘‘ सुमारे ३०० मजुरांना मध्य प्रदेशात पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यातील काही आलेले आहेत. काही येत आहेत. त्यांना बसने पुणे स्टेशनला नेण्यात येईल. तेथून रेल्वेने मध्यप्रदेशात पाठविण्यात येईल. त्यांच्या जेवणाची पूर्ण काळजी घेतली आहे. शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात येत आहे.’’ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘ पोलिस, जिल्हा प्रशासनाकडून थोडीफार मदत झाली. मात्र, जेथे काम करीत होतो, तेथील ठेकेदाराने आमच्याकडे दुर्लक्ष केले. जेवण, अन्न-धान्य काहीही दिले नाही. म्हणून गावी निघालो आहे,’’ अशी व्यथा एका मजूराने मांडली. तर, दुसरा एक जण म्हणाला, ‘‘ पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडून चांगली मदत झाली. मात्र, आता पैसे संपले आहेत, त्यामुळे गावी गेल्याशिवाय पर्याय नाही.’’ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT