पुणे

सर्वांना नियम सारखे! पुणे पोलिसांची KKR च्या खेळाडूवर कारवाई

सूरज यादव

पुण्यात पोलिसांचा अनेक ठिकाणी कडक बंदोबस्त असून विनाकारण आणि विनामास्क बाहेर पडणाऱ्यांवर थेट कारवाई करताना दिसून येत आहेत.

कात्रज - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरात कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. पुण्यात पोलिसांचा अनेक ठिकाणी कडक बंदोबस्त असून विनाकारण आणि विनामास्क बाहेर पडणाऱ्यांवर थेट कारवाई करताना दिसून येत आहेत. या कारवाईत काही दिग्गज व्यक्तींवरही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू राहूल त्रिपाठीवर पु्ण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडीमशीन चौकात विनामास्क कारवाई केली आहे.

शुक्रवारी दुपारच्या वेळी केकेआरचा खेळाडू राहूल त्रिपाठी हा आपल्या चारचाकी मोटारीने सासवडहून खडकी येथे जात होता. तेव्हा खडीमशिन चौकात कोंढवा पोलिसांनी त्याच्यावर विनामास्कची दंडात्मक कारवाई करत 500 रुपये दंड वसूल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, दुपारच्यावेळी खडीमशिन चौकात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी चारचाकीतून जाणारा हा विनामास्क असल्याचे आम्हाला आढळून आले. तेव्हा दंडात्मक कारवाई करण्यात आली.

नाकाबंदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी थांबवले असता तो क्रिकेटर राहूल त्रिपाठी असल्याचे लक्षात आले. मात्र, सर्वांना नियम सारखे असल्याचे निदर्शनास आणून देत आम्ही कारवाई केली. त्रिपाठी यांनीही तत्काळ दंड भरल्याची माहिती कोंढवा पोलिस स्थानकाचे उपनिरिक्षक संतोष सोनावणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT