crime news  esakal
पुणे

Crime News : पोलीस असल्याची बतावणी; सव्वादोन तोळे वजनाची सोन्याची चैन लांबवली

मोटारसायकल वरून आलेल्या दोन अनोळख्या व्यक्तीने पोलीस असल्याची बतावणी करून आम्ही चोरीचा तपास करत असून तुमच्या गळ्यातील चैन आम्हाला तपासायची आहे.

सुदाम बिडकर

मोटारसायकल वरून आलेल्या दोन अनोळख्या व्यक्तीने पोलीस असल्याची बतावणी करून आम्ही चोरीचा तपास करत असून तुमच्या गळ्यातील चैन आम्हाला तपासायची आहे.

पारगाव - पारगाव, ता. आंबेगाव ते लाखणगाव रस्त्यावर बापू किसन धरम (वय-50 वर्षे, रा. लाखणगाव, ता. आंबेगाव) यांना मोटारसायकल वरून आलेल्या दोन अनोळख्या व्यक्तीने पोलीस असल्याची बतावणी करून आम्ही चोरीचा तपास करत असून तुमच्या गळ्यातील चैन आम्हाला तपासायची आहे, असे सांगत गळ्यातील सव्वादोन तोळे वजनाची सोन्याची चैन हातचलाखी करून लंपास केली आहे.

पारगाव कारखाना पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार, बापू किसन धरम काल मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पारगाव गावचे हद्दीत लाखणगाव रस्त्यावर चीजगाई वस्ती दरम्यान मोटारसायकल वरून चालले असता त्यांच्या पाठीमागून दोन अनोळखी इसम त्यांच्या मोटरसायकलवर येऊन श्री. धरम यांची मोटरसायकल थांबवून पोलीस असल्याचे सांगून नागापूर येथे चोरी झाली आहे. तेव्हा तुमच्या गळ्यातील सोन्याची चैन आम्हाला चेक करायची आहे, असे म्हणून चैन घेऊन हात चलाखी करून सुमारे 90 हजार रुपये किमतीची सव्वा दोन तोळे वजनाची सोन्याची चैन लंपास केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहुजी थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव पोलीस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT