Bitcoin fraud case
Bitcoin fraud case sakal
पुणे

बिटकॉईनच्या तपासात सहभागी पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी

सकाळ वृत्तसेवा

बिटकॉईन फसवणुक प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, उच्चस्तरीय तज्ज्ञांची चौकशी समिती नेमावी, रविंद्र पाटील याची मालमत्ता जप्त करावी अशी मागणी बिटकॉईन प्रकरणी फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी सोमवारी केली.

पुणे - बिटकॉईन (Bitcoin) फसवणुक प्रकरणातील (Fraud Case) पोलिस अधिकाऱ्यांची (Police Officer) चौकशी (Inquiry) करावी, उच्चस्तरीय तज्ज्ञांची चौकशी समिती नेमावी, रविंद्र पाटील (Ravindra Patil) याची मालमत्ता जप्त (Property Seized) करावी अशी मागणी बिटकॉईन प्रकरणी फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी (Investor) सोमवारी केली. तसेच बिटकॉईनच्या या प्रकरणामध्ये तब्बल दिड लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करुन त्याची कसून चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

बिटकॉईन गुंतवणुकीत फसवणुक झालेल्या नागरीकांनी सोमवारी पत्रकार परिषदत घेत विविध प्रकारच्या मागण्या केल्या. यावेळी गुंतवणुकदारांच्यावतीने हेमंत दवे व निशा रायसोनी यांनी माहिती दिली. दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बिटकॉईन फसवणुक प्रकरणी दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात मुख्य सुत्रधार अमित भारद्वाज व इतरांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणाच्या तांत्रिक तपासासाठी सायबर तज्ज्ञ म्हणून नेमलेल्या पंकज घोडे व रविंद्र पाटील यांनीच पोलिसांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्‍वासाचा गैरफायदा घेत तक्रारदार व आरोपींच्या वॉलेटमधील बिटकॉईन स्वतःच्या वॉलेटमध्ये वर्ग करीत पोलिसांचीही फसवणूक केली. या प्रकरणात केवळ त्यांचाच सहभाग नसून तत्काली पोलिस अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप गुंतवणुकदारांनी केला.

या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय तज्ञांची समिती नियुक्त करावी अशी मागणी त्यांनी केली. याबरोबरच बिटकॉईन प्रकरणात अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांचा सहभाग असून त्यांनी लाखो बिटकॉईनचा अपहार केलेला आहे. भारद्वाज बंधूनी केलेल्या बिटकॉईन चोरीच्या प्रकरणात त्यांच्यावर महाराष्ट्रासह देभरात ४२ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून तब्बल दिड लाख कोटी रुपयांचा हा गैरव्यवहार आहे. पोलिसांनी ब्लॉकचेनमध्ये बिटकॉईनचे व्यवहार अचूकपणे तपासण्यासाठी चैन अनॅलिसीस सॉफ्टवेअरची मदत घ्यावी. रवींद्र पाटील याने त्याच्या ‘केपीएमजी’ कंपनीच्या माध्यमातुन किती बिटकॉईन लंपास केले, याचा सखोल तपास करावा, त्यांच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि पाटीलची मालमत्ता जप्त करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT