Pune News  Sakal
पुणे

Pune News : खराडी पार्टीतील व्हिडिओ, फोटो लीक कसे? रोहिणी खडसे यांची पोलिस आयुक्तांकडे तक्रार; निष्पक्ष तपासाची मागणी

Rohini Khadse : खराडीत हॉटेलमधील पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर व्हिडिओ आणि फोटो कोण लिक करतंय याची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खराडीत हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातील कारवाईचे चित्रीकरण आणि छायाचित्रे कोणी प्रसारित केली, याचा पारदर्शक तपास व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली.

या प्रकरणात रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक केली आहे. यापूर्वी रोहिणी खडसे यांनी सोमवारी (ता. २८) रात्री गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांची भेट घेऊन पारदर्शकपणे तपास करण्याची विनंती केली. त्यानंतर खडसे यांनी बुधवारी (ता. ३०) पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिला.

डॉ. खेवलकर यांचा मोबाइल पोलिसांकडे असूनही, त्यातील व्हिडिओ आणि छायाचित्रे पहाटे जळगावमधील एका आमदाराकडे कशी पोहोचली, हा मोठा प्रश्न आहे. डॉ. खेवलकर यांना या पार्टीतील अन्य व्यक्तींबाबत पूर्वीपासून काहीही माहिती नव्हती. पार्टीत अचानक दोन अनोळखी तरुणी आल्या आणि थोड्याच वेळात पोलिसांनी छापा टाकला, ही बाब संशयास्पद असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Mayor List: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये कोणाची सत्ता? महापौर आणि उपमहापौर कोण? वाचा संपूर्ण यादी...

Government ration scheme : श्रीमंतांना सोडता सोडवेना रेशनवरचे धान्य! गहू, तांदूळ विकायचा नवा धंदा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील बी.टी. कावडे रोडवरील इमारतीला भीषण आग

BMC Mayor: ४४ वर्षानंतर भाजपची सत्ता! मुंबई महापौरपदी रितू तावडेंची निवड, पण आता त्यांच्यासमोर आव्हाने कोणती? वाचा पडद्यामागची गोष्ट

Mumbai : 5 वर्षीय मुलीवर अत्याचार, जन्मठेपेची शिक्षा केली कमी; निबंध अन् गांधीजींचा अभ्यास केल्यानं हायकोर्टाकडून कपात

SCROLL FOR NEXT