पुणे

उंब्रज येथे अवघ्या आठ मिनीटात चार जुगार अड्डे उध्वस्त

CD

उंब्रजला चार मटका अड्ड्यांवर छापा

उंब्रज, ता. १ : येथील बाजारतळ परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका अड्ड्यावर येथील पोलिसांनी काल एकाच वेळी सलग कारवाई करत छापा टाकला. काल सायंकाळी पाचच्या सुमारास सापळा रचून अवघ्या आठ मिनिटांत पिंपळाच्या झाडाजवळ, पाण्याच्या टाकीजवळ, मच्छी मार्केट परिसरात आणि राज पान शॉपच्या आडोशाला सुरू असलेल्या अड्ड्यांवर छापे टाकले.

यावेळी जुगारासाठी वापरण्यात येणारी स्लिपबुक, पेन व सुमारे आठ हजार ४५० रुपयांहून अधिक रोकड जप्त केली. सर्व संशयितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हे दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात अवैध व्यावसायिकांवर कारवाईसाठी उपविभागीय कार्यालय व येथील पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी छापासत्र सुरू केले आहे.
अस्लम मुल्ला (रा. उंब्रज), संभाजी जाधव (रा. चरेगाव), सुरेश कांबळे (रा. संत रोहिदासनगर, उंब्रज), राजू ऊर्फ राजेंद्र धोंडिराम जाधव, संजय लक्ष्मण चव्हाण (दोघेही रा. उंब्रज), महेश गुलचंद पवार (रा. शिवाजीनगर, उंब्रज) हे मटका जुगाराचे पैसे घेताना सापडले. एकाच वेळी सलग छापे टाकून पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबर, सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार, उपविभागीय कार्यालयातील प्रवीण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी यांच्यासह पोलिस सहभागी होते.
श्री. फडतरे, श्री. पवार तपास करत आहेत.

.........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

शेतमाल विक्री करणाऱ्यांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या अनुज्ञप्ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू; नेमके कारण काय?

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Latest Marathi News Update : तामिळनाडू कॉंग्रेसमुक्त पहिले राज्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT