police sakal news
पुणे

पोलिस उपनिरीक्षकाने घेतली ५० हजारांची लाच

फसवणुकीच्या गुन्ह्यातील पैसे परत मिळवून देण्यासाठी मागीतली लाच

सकाळ वृत्तसेवा

पुणे - फसवणुकीच्या गुन्ह्यातील पैसे परत मिळवून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. सागर दिलीप पोमण (वय ३४) असे लाचखोर पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

पोमण हे हडपसर पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहेत. तक्रारदाराने हडपसर पोलिस ठाण्यात आर्थिक व्यवहारात फसवणूक झाल्याबाबतचा तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जाची चौकशी पोमण यांच्याकडून करण्यात येत होती. फसवणूक प्रकरणातील पैसे परत मिळवून देतो, असे सांगून पोमण यांनी तक्रारदारांकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दिली होती.

तक्रारीची चौकशी करून पोमण यांना लाच स्वीकारताना अटक करण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच घेणाऱ्या पोमण यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT