taking bribe Sakal
पुणे

बारामतीत पोलिस उपनिरीक्षकासह दलाल लाचलुचपतच्या जाळ्यात

पोलिस उपनिरीक्षकाकडून पैसे न दिल्यास विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

मिलिंद संगई

बारामती - येथील तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक व दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि पैसे न दिल्यास विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्याचा पोलिस उपनिरिक्षक विलास अशोक धोत्रे (वय 34) व ह्रषिकेश नंदकुमार पतंगे (वय 24) या दलालाला ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी (ता. 9) रात्री उशीरा ही कारवाई झाली.

यासंबंधी एका व्यक्तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज आला होता. त्या अर्जावरून गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि पैसे दिले नाहीत तर विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी धोत्रे यांनी दिली होती. त्यानुसार तक्रादाराने 20 हजार रुपयांची रक्कम देण्याचे मान्य केले. त्यातील 15 हजार रुपये स्विकारताना धोत्रे व पतंगे यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर अधिक्षक सूरज गुरव, उपअधिक्षक शितल घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रणेता सांगोलकर, हवालदार मुकुंद पायचित यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT