Policemen hit in the police station
Policemen hit in the police station 
पुणे

पोलिस कर्मचाऱ्याला पोलिस ठाण्यातच मारहाण

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरातील अवैध व्यवसायांवर कारवाई केल्याच्या रागापोटी पोलिस ठाण्यात एका पोलिस कर्मचाऱयास मारहाण केल्याप्रकरणी दौंडचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्यासह एकूण पाच जणांवर कारवाई करण्याची मागणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने केली. पोलिस प्रशासनाने दीड महिन्यानंतरही याप्रकरणी कारवाई केलेली नाही. 

दौंड पोलिस ठाण्याचे नाईक संदेश सूर्यवंशी यांचा २४ मार्च २०१८ रोजी रात्री पोलिस ठाण्यात रिपाइं (आठवले गट) चे स्थानिक नेते प्रकाश भालेराव यांच्याबरोबर वाद झाल्यानंतर सतीश थोरात, मोहन पडवळकर व प्रशांत भालेराव यांनी सूर्यवंशी यांना दोनवेळा कानाखाली मारत मारहाण केली होती. मारहाणीनंतर संदेश सूर्यवंशी यांनी पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याकडे सदर प्रकरणी गुन्हा दाखल करावयाचे सांगितले असता निंबाळकर यांनी त्वरीत गुन्हा दाखल केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करीत २६ एप्रिल रोजी सदर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देत सूर्यवंशी यांची बोळवण केली.

दरम्यान, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याएेवजी पोलिस निरीक्षकांनी सूर्यवंशी यांचा कसुरी अहवाल पाठविला. असे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. सदर मारहाणीनंतर २६ मार्च रोजी वरिष्ठांच्या आदेशाने दौंड शहरात तीन ठिकाणी धाडी टाकून मटकाप्रकरणी प्रशांत आबाजी भालेराव (वय ३८, रा. घंटे चाळ, दौंड) व इतर आठ जणांना अटक करण्यात आली होती. 

पुणे ग्रामीणचे पोलिस दलाचे अधीक्षक यांना भेटून सर्व प्रकार सांगण्यासह झालेल्या प्रकाराचे चित्रीकरण दाखविण्यात आल्याचा दावा सूर्यवंशी यांनी केला. सदर मारहाणप्रकरणी चार जणांसह या आरोपींना पाठीशी घातल्याप्रकरणी पोलिस निरीक्षकांविरूध्द देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रार अर्जाद्वारे करीत त्या मागणीस एफआयआर समजून कारवाई करण्याची मागणी सूर्यवंशी यांनी २६ एप्रिल रोजी पोलिस महासंचालक यांच्यासह संबंधितांकडे केली आहे. त्याचबरोबर या पाच जणांकडून जीवितास धोका असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. 

प्रकाश भालेराव यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, हे सर्व खोटे व पूर्वनियोजित असून, जाणूनबुजून करण्यात आलेले आहे. चौकशी झाल्यास आपण त्यास सामोरे जाऊ. पोलिस कर्मचाऱ्यास पोलिस ठाण्यातच मारहाण झाल्यामुळे स्वतःची अकार्यक्षमता चव्हाट्यावर येऊ नये, याकरिता वरिष्ठ अधिकारीही याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यास चालढकल करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला आव्हान देण्यासाठी पंजाब सज्ज; आत्तापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT