political activist to recreate the facility
political activist to recreate the facility 
पुणे

चिकन बिर्याणी खा, खूष व्हा ! 

सकाळवृत्तसेवा

पुणे - चविष्ट चिकन दम बिर्याणी... लज्जतदार व्हेज बिर्याणी, जिभेवर चव रेंगाळत ठेवणाऱ्या "दालचा'पासून ते तांबड्या-पांढऱ्या रश्‍शापर्यंतच्या खाद्यपदार्थांवर कार्यकर्ते ताव मारू लागले आहेत. प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन भाऊ, ताईच्या नावाचा जयघोष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या श्रमपरिहारासाठी खास मद्यपानाची व्यवस्थाही होत आहे. काही "गब्बर' उमेदवारांकडून कार्यकर्त्यांबरोबरच मतदारांसाठी जेवणावळी घातल्या जात आहेत, तर काहींनी कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी भरपूर "रेशन' भरून कोल्हापूरहून आचारी मागविले आहेत. 

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी रात्रंदिवस एक करण्यास सुरवात केली आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत हक्काच्या व "पेड' कार्यकर्त्यांच्या पोटापाण्याची तारांबळ होऊ नये म्हणून काही उमेदवारांनी खाण्यापिण्यामध्ये कुठलीही कमतरता न ठेवण्याचे आदेश आपले नियोजनकर्ते व खजिनदारांना दिले आहेत. कळस-धानोरी (प्रभाग एक)मधील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या "गब्बर' उमेदवाराकडे दररोज हजारो कार्यकर्त्यांच्या जेवणावळी होत आहेत. सकाळी चहा, नाश्‍ता, दुपार व रात्रीचे जेवण असे खास मिष्ठान्नाचे "पॅकेज' कार्यकर्त्यांना मिळत आहे. 

औंध-बोपोडीमध्ये (प्रभाग 8) एका महिला उमेदवाराने कार्यकर्त्यांना खास कोल्हापुरी खाद्यपदार्थांची चव घेता यावी म्हणून कोल्हापूरहून आचारी मागविला आहे. "भरपूर राशन भरलयं. आता फूल "नॉनव्हेज' आणि तांबडा-पांढरा रस्सा कार्यकर्त्यांना ठेवलायं', असे संबंधित महिला उमेदवाराचे पती सांगण्यास विसरत नाहीत. काही उमेदवारांचे हॉटेल्स, ढाबे व स्नॅक्‍स सेंटर आहेत. कार्यकर्त्यांना कूपन देऊन "काहीही खा... कितीही खा' असा प्रेमळ आदेशही दिला जात आहे. 

"चिकन बिर्याणी' हा कार्यकर्त्यांचा आवडता मेनू, त्यामुळे चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, दालचासाठी कॅम्पमधील केटरर्सकडे व त्या-त्या भागातील केटरर्सकडे ऑर्डर दिल्या जात आहेत. केटरिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रतीकनगर जवळच्या "केटरर्स चाळी'त खमंग वास घुमू लागला आहे, तर शहराच्या मध्यवर्ती भागातील कार्यकर्त्यांसाठी मसाले भात, पुरी-भाजी, खिचडी असा "साजूक मेनू' ठेवला जात असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. 

उमेदवारांकडून चिकन व व्हेज बिर्याणीचीच ऑर्डर दिली जाते. पाच ते दहा किलोपर्यंतच्या ऑर्डर असतात. एका किलोमध्ये पाच-सहा जण जेवू शकतात. पाच किलोपेक्षा जास्त ऑर्डर असेल तर त्याचे दर कमी होतात. ऑर्डरचे प्रमाण अद्याप कमी असले तरी निवडणूक जवळ आल्यानंतर हे प्रमाण वाढेल. 
- अनिस तांबोळी, तांबोळी केटरर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT