पुणे

निमोणे परिसरात डाळिंब बागा उद्ध्वस्त

CD

गुनाट, ता. १४ : निमोणे (ता. शिरूर) परिसरात बुधवारी (ता. १३) सायंकाळी झालेल्या पावसामुळे डाळिंब बागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या वेगामुळे झाडे उन्मळून पडली असून, काढणीला आलेली फळे गळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक ठिकाणी वीज खांब आणि झाडे पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
येथील शेतकरी दौलत जयसिंग काळे यांची सव्वा एकरमधील ४०० डाळिंबाची झाडे जमीनदोस्त झाली. विक्रीसाठी तयार फळांची गळती झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच, ६५ हजार रुपयांचे क्रॉप कव्हरही फाटले आहे. सूरदास खंडेराव काळे यांच्या एक एकरमधील ३५० झाडांच्या फांद्या मोडल्या असून, श्यामराव काळे यांची दीड एकरमधील बागही उद्ध्वस्त झाली. श्यामराव यांनी अडीच लाख रुपये खर्चून जोपासलेली बाग तोडणीपूर्वीच नष्ट झाली.
डाळिंबासह दौलत काळे यांचे अर्धा एकरमधील कारले पीकही जमीनदोस्त झाले. यातून त्यांना ५० हजारांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. दरम्यान, निमोणे-शिंदोडी आणि गुनाट-शिंदोडी मार्गावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामस्थांनी तातडीने झाडे हटवून रस्ता मोकळा केला. महावितरणचे वीज खांब कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता.

पंचनाम्याची मागणी
अवकाळी पावसामुळे डाळिंब व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.

00360

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT