पुणे

कृषिमंत्र्यांनी मागितली शेतकऱ्याला भेटीची वेळ डाळिंब संघ सुरू करण्यासह शीतगृहाच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद

CD

पुणे, ता. ७ : डाळिंब उत्पादकांच्या अडचणींची चर्चा आंतरराष्ट्रीय परिषदेत होत असतानाच सांगोला तालुक्यातील शेतकऱ्याने आपल्या समस्या थेट कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासमोर मांडल्या.
आठ-दहा वर्षांपासून डाळिंब संघ बंद आहे. शेतकऱ्यांच्या मालासाठी शीतगृहाचीही गरज आहे, अशी मागणी अण्णा गडदे यांनी केली. त्यावर भरणे यांनी, ‘‘तुम्ही माझी वेळ मागू नका, मी तुमची वेळ मागतो. तुमच्या शेतावर कधी येऊ?,’’ असे सांगत पुढील आठवड्यात गौडवाडीला येण्याची तयारी दर्शविली.
पुण्यातील यशदा येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेदरम्यान भरणे यांनी डाळिंब उत्पादकांशी थेट संवाद साधला. या वेळी शेतकरी अण्णा गडदे यांनी २०१४ पासून गटशेतीच्या माध्यमातून सुमारे चार हजार डाळिंब उत्पादक एकत्रितपणे काम करीत असल्याची माहिती दिली. यातील सुमारे ९० टक्के शेतकरी युरोपच्या बाजारपेठेसाठी डाळिंबाचे उत्पादन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनामुळे रोग नियंत्रणातही चांगले परिणाम मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या आठ-दहा वर्षांपासून डाळिंब संघ बंद असल्याने उत्पादकांसाठी संघटनात्मक व्यासपीठ पुन्हा कार्यरत करण्याची गरज असल्याचे गडदे यांनी सांगितले.
यावर भरणे यांनी, ‘‘डाळिंब संघ सुरू होण्यासाठी संबंधितांनी एकत्र बसून मार्ग काढावा. शेतकऱ्यांनीही संघाच्या कामकाजासाठी वेळेवर वर्गणी भरावी. द्राक्ष बागायतदार संघाप्रमाणे डाळिंब उत्पादकांचा संघ सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू,’’
इंदापूर परिसरातील ब्रह्मदेव दुधाळ यांनी २० एकर डाळिंब शेतीतून सुमारे पाच कोटी ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे सांगितले. नवीन तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनाची गुणवत्ता आणि बाजारपेठेचा अंदाज घेऊन नियोजन केल्यास डाळिंब शेतीत चांगले उत्पन्न मिळू शकते, याचे उदाहरण त्यांनी मांडले. माळशिरस परिसरातील एका शेतकऱ्याने तीन एकरांतून १० ते १२ लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा व्यक्त केली.


‘‘सांगोल्यात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते; मात्र बाजारपेठ आणि शीतगृहाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेला डाळिंब संघ सुरू झाल्यास निर्यात आणि विक्रीच्या अडचणी सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम व्यासपीठ मिळेल. तालुक्यात शीतगृह उभारणेही तितकेच गरजेचे आहे. कार्यक्रम संपल्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे हे भेटले आणि त्यांनी गावाला भेट देणार असल्याचा पुनरुच्चार केला. आता या प्रश्नांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- अण्णा गडदे, डाळिंब उत्पादक, गौडवाडी (जि. सोलापूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rules: ग्राहकांना मोठा दिलासा! सिलिंडर वितरण नियमात बदल, बुकिंगमधील अंतर केले कमी

Tigress Captured : युवतीसह शेतकऱ्याला ठार मारणारी वाघीण जेरबंद

Kirit Somaiya : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी कथित बेकायदेशीर अतिक्रमण; लँड जिहाद चा धक्कादायक प्रकार, आंदोलनाचा दिला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT