भोर : भोर महाड मार्गावरील कोंढरी (ता. भोर)येथील घरांवर डोंगराचा काही भाग दरड कोसळण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने गावातील 35 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू केली आहे.
कुंडली गावात बुधवारी (ता.7) दुपारीभिवबा पारठे यांच्या घराच्या पाठीमागे डोंगराचा काही भाग कोसळला. घटनेची माहिती मिळताच सायंकाळी प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह गावास भेट दिली. त्यांच्यासमवेत माजी उपसभापती सुनील बेडके धनंजय शिरवले लक्ष्मण दिघे सुधीर दिघे विलास मादगुडे उपस्थित होते.
प्रांताधिकाऱ्यांनी त्वरित दरळ कोसळलेल्या ठिकाणचे भिवबा पारठे चंद्रकांत मांढरे व सुरेश पारठे यांच्या कुटुंबांना स्थलांतरित केले. महसूल विभागाचे गाव कामगार तलाठी व मंडळाधिकारी यांना गावातच थांबण्याचे आदेश दिले.
आज गुरुवारी सकाळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने गावातील 35 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी सुरू केली. प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी पंचायत समिती, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू फोर्ससह कोंढरी गावात गेले आहेत. कोंडली गावात नेटवर्क नसल्यामुळे प्रशासनाला व्यवस्था करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.