Post Box Sakal
पुणे

काय करावं चोरट्यांना ! गड्यांनी पोस्टाची 300 रुपयांची लाल पत्रपेटीही सोडली नाही !

काही महिन्यांपुर्वी चोरट्यांकडून शाळा-कॉलेजची कार्यालये, दवाखाने, मेडीकल अशा कधी चोरी न होणाऱ्या ठिकाणांवरही चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आत्तापर्यंत चोरट्यांनी (Thief) घरफोडी केली, दुकाने लुटले किंवा वाईनशॉपीमध्ये चोरी केली, इथपर्यंत आपण ऐकत आलो होतो. काही महिन्यांपुर्वी चोरट्यांनी शाळा, दवाखाना, मेडीकलमध्येही चोरी (Theft) केल्याच्या भन्नाट किस्से आपण ऐकले. पण रस्त्याच्याकडेला पदपथावर असलेली पोस्टाची लाल पत्रपेटी (Post Box) कधी चोरीला गेल्याचे तुम्ही कधी ऐकलेय का हो, नाही ना. पण पुण्यात 300 रुपये किंमतीची पोस्टाची लाल पेटी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अगदी पत्रपेटीचीही चोरी करायची न सोडणाऱ्या या चोरट्यांना आता काय कराव ! असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहात नाही. (Post Box Theft by Thief Crime)

काही महिन्यांपुर्वी चोरट्यांकडून शाळा-कॉलेजची कार्यालये, दवाखाने, मेडीकल अशा कधी चोरी न होणाऱ्या ठिकाणांवरही चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. एकूणच घरफोडी, वाहनचोरी, बस किंवा लग्नामधील चोरी अशा नेहमीच्या चोरीच्या प्रकारांपेक्षा चोरट्यांचे नवीन चोरी प्रकार जरा धक्का देणारेच होते. त्यामुळे साहजिकच नागरीकांनाही धक्का बसला होता. पण आता मात्र चोरट्यांनी कहरच केला आहे. सेनापती बापट रस्त्यावरील सहारा हॉटेलसमोर पोस्ट ऑफीसकडून अनेक वर्षांपुर्वी लाल पत्रपेटी बसविलेली आहे.

शिवाजीनगर येथील मॉर्डर्न कॉलनी पोस्ट कार्यालयातील शिपाई नाथू बधे (वय 53, रा.हडपसर) नेहमीप्रमाणे 1 मे रोजी त्यांच्या पोस्ट ऑफीसच्या हद्दीमध्ये येणाऱ्या सेनापती बापट रस्त्यावरील सहारा हॉटेलसमोरील बाजुच्या भिंतीच्या ग्रीलला तारेने बांधलेली पोस्ट कार्यालयाच्या लाल पत्रपेटीतील पत्र काढण्यासाठी गेले. पत्र काढल्यानंतर त्यांनी ती पत्रपेटी कुलूप लावून बंद केली. त्यानंतर ते पुन्हा 3 मे रोजी संबंधीत पत्रपेटी खोलण्यासाठी गेले.

तेव्हा, त्यांना तेथील पत्रपेटीच अनोळखी व्यक्तींनी काढून चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. भारतीय डाक असा उल्लेख असलेली 300 रुपये किंमतीची पत्रपेटी अनोळखी व्यक्तीने चोरुन नेली. याप्रकरणी त्यांनी तत्काळ चतुःशृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT