postgraduate courses in Central Universities cuet exam Applications submitted till June 18 pune
postgraduate courses in Central Universities cuet exam Applications submitted till June 18 pune esakal
पुणे

केंद्रीय विद्यापीठांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी १८ जूनपर्यंत अर्ज करता येणार

- मीनाक्षी गुरव

पुणे : केंद्रीय विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षेसाठी (सीयुईटी) पुन्हा अर्ज करण्याची प्रक्रिया नुकतीच सुरवात झाली आहे. आता विद्यार्थ्यांना १८ जूनपर्यंत नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संकेतस्थळावरून परीक्षेसाठी अर्ज भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी पुन्हा संधी दिल्याने आता ही परीक्षा मात्र लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

देशभरातील ४२ केंद्रीय विद्यापीठांसाठी ‘सीयुईटी’ ही प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. केंद्रीय विद्यापीठांतील प्रवेशासाठी सीयुईटी आयोजित करण्याची घोषणा विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत नुकतीच करण्यात आली होती. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी एनटीए कडून केंद्रीय विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘सीयूईटी’ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एनटीएच्या संकेतस्थळावर सहभागी केंद्रीय विद्यापीठांची यादी आणि अन्य तपशील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सीयूईटीमध्ये सहभागी झालेल्या देशभरातील केंद्रीय विद्यापीठांतील प्रवेशासाठीची संधी विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेद्वारे मिळणार आहे. पदव्युत्तर प्रवेशासाठी होणारी ही परीक्षा संगणकावर घेण्यात येणार आहे. तर परीक्षा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. केंद्रीय विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देश पातळीवर ही एकच परीक्षा घेतली जाणार आहे. ‘एनटीए’ने परिपत्रकाद्वारे परीक्षेबाबतचा तपशील नुकताच जाहीर केला आहे.

परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळ

https:/cuet.nta.nic.in/

www.nta.ac.in

‘सीयुईटी’ परीक्षेबाबत तपशील

  • ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदत : १८ जून २०२२

  • परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी अंतिम मुदत : १९ जून २०२२

  • परीक्षेचा कालावधी : दोन तास (१२० मिनिटे)

  • परीक्षेची वेळ : पहिले सत्र (सकाळी १० ते दुपारी १२), दुसरे सत्र (दुपारी ३ ते सायंकाळी ५)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT