कांब्रे - पोल्ट्री फॉर्ममध्ये पक्ष्यांना औषधाचा डोस देताना देशमुख दांपत्य.
कांब्रे - पोल्ट्री फॉर्ममध्ये पक्ष्यांना औषधाचा डोस देताना देशमुख दांपत्य. 
पुणे

गड्या आपुला गाव बरा

सकाळवृत्तसेवा

टाकवे बुद्रुक - कामाच्या शोधात त्याने मुंबई गाठली, उच्चशिक्षित असूनही त्याला मनासारखा नोकरी मिळेना. वाढती महागाई, मुंबईत राहण्याची कसरत, मिळणाऱ्या कमाईतून कुटुंब कसे सांभाळायचे ही विवंचनाही वाढली. शेवटी ‘गड्या आपुला गाव बरा’ म्हणत त्याने मुंबई सोडून गाव गाठले. गावातच त्याला कुक्कुटपालन व्यवसायाचा आधार मिळाला आणि कुक्कुटपालनातून त्याने संसार सावरला. 

आंदर मावळातील कांब्रे येथील राजू देशमुख असे या तरुणाचे नाव. दर वर्षी तो दोन लाखांचे उत्पन्न घेतो. पाच वर्षांपासून त्याने करारावर घेतलेल्या दुसऱ्याच्या पोल्ट्री फार्म घेतला आहे. त्यात तो आणि त्याची पत्नी कुसुम दिवसभर राबवून व्यवसाय सांभाळत आहेत. नोकरी व्यवसायासाठी खेड्यापाड्यातील नागरिकांचे लोंढे शहराच्या दिशेने धावत आहेत. त्यामुळे शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे. शहरात राहून पाणी, स्वच्छता, आरोग्य, मुलांचे शिक्षण आणि संगोपन या सगळ्या गोष्टी करताना तारेवरची कसरत करावी लागते. हे सगळे देशमुख यांनी पाहिले आणि गावाला परत येऊन गावातील भाऊसाहेब आलम यांचे पाच हजार पक्ष्यांचे पोल्ट्री शेड कराराने घेतले. वर्षभरात किमान २५ हजार पक्ष्यांची वाढ व विक्री ते करतात.

पुणे-मुंबई शहरात चिकनला मोठी मागणी आहे. दोन ते अडीच महिन्यांत पाच हजार पक्ष्यांची विक्री करण्याचे उद्दिष्ट ते पूर्ण करत आहेत. कोंबड्याच्या पिलांपासून त्यांचे खाद्य, औषधे, तज्ज्ञ कुक्कुटपालन क्षेत्रातील कार्पोरेट कंपन्या त्यांना पुरवतात. विजेची आणि पाण्याची सोय संबंधित पोल्ट्रीधारक करून देतात. त्यामुळे देशमुख सहकुटुंब तेथे राबवून वर्षाला दोन लाख रुपये नफा मिळवतात. 

भाऊसाहेब आलम म्हणाले, ‘‘माझी पोल्ट्री फॉर्मच्या दोन शेड आहेत. मी पाच हजार पक्ष्यांचे शेड चालवितो. दुसरे पाच हजार पक्ष्यांचे शेड राजू देशमुख यांना भाड्याने दिले. मला भाड्यापोटी चार पैसे मिळतात आणि देशमुख यांनाही रोजगार देता आला याचे समाधान आहे.’’

मुंबईत हाताला मिळेल ते काम करत होतो. मात्र, त्यात गुजराण होत नव्हती. कुटुंबही गावाकडे होते. मात्र, आता गावातच व्यवसाय सुरू केल्याने घर सांभाळून चार पैसेही मिळतात. 
- राजू देशमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT